भारतीय संघासाठी रविवारचा (दि. 24 सप्टेंबर) दिवस खूपच खास ठरला. इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 99 धावांनी (डकवर्थ लुईस नियमानुसार) लोळवले. या विजयासह भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा प्रभारी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने भारतीय शतकवीरांसाठी गौरवोद्गार काढले. चला तर, स्मिथ नेमका काय म्हणालाय जाणून घेऊयात…
पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत स्टीव स्मिथ याने दुसऱ्या वनडेत कर्णधारपद सांभाळले. त्याने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी भारतीय फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावत 399 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. यावेळी भारताकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्यात 200 धावांची भागीदारी झाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी आला, तेव्हा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 33 षटकात 317 धावांचे आव्हान मिळाले होते हे आव्हान पार करण्यात स्मिथसेना अपयशी ठरली. त्यांना 28.2 षटकात सर्व विकेट्स गमावत 217 धावाच करता आल्या.
काय म्हणाला स्मिथ?
अशात सामना पराभूत झाल्यानंतर स्मिथने भारताचे शतकवीर श्रेयस (105) आणि शुबमन (104) यांच्या फलंदाजीचे तोंडभरून कौतुक केले. सामन्यानंतर स्मिथ म्हणाला, “आज सुरुवातीला श्रेयस आणि गिलने ज्याप्रकारचा खेळ दाखवला, तो शानदार होता. त्यानंतर राहुल आणि सूर्याने ते केले, ज्याबद्दल आपल्याला आधीपासूनच माहिती आहे. आम्हाला वाटले होते की, काल झालेल्या पावसामुळे खेळपट्टी जरा चिकट होईल, पण तसे झाले नाही. मागील काही वनडे सामन्यात आम्हाला पराभव मिळाला आहे. मात्र, आम्हाला आशा आहे की, आम्ही लवकरच पुनरागमन करू.”
ऑस्ट्रेलियाने गमावले सलग 5 वनडे सामने
खरं तर, ऑस्ट्रेलिया संघाने अलीकडे वनडे क्रिकेटमध्ये खूपच खराब प्रदर्शन केले आहे. ऑस्ट्रेलियाने मागील 5 सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे. भारतापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचे 3 सामने पराभूत झाला होता. याचे कारण खेळाडूंच्या दुखापती सांगितले जात आहे. संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हादेखील दुखापतग्रस्त आहे. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्रेविस हेड हादेखील दुखापतग्रस्त झाला होता. (ind vs aus 2nd odi match captain steve smith statement after lose series against india)
महत्त्वाच्या बातम्या-
इंदोरमध्ये अश्विनचा भीमपराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनिल कुंबळेचा मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त
‘मी विचारच केला नव्हता…’, सलग दुसऱ्या वनडेत कांगारूंना ठेचल्यानंतर कॅप्टन राहुलचे हैराण करणारे विधान