भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना ब्रिस्बेन येथील ऐतिहासिक गाबा मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजा आणि आकाश दीप संघात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानात उतरताच अनोखे शतक झळकावले आहे. कोहलीने हे शतक बॅटने नाही तर सामना खेळण्याच्या दृष्टीने केले आहे. हा त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वा सामना आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 सामने खेळले होते. 91 सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळलेले भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर- 110 सामने
विराट कोहली- 100 सामने
महेंद्रसिंग धोनी- 91 सामने
रोहित शर्मा- 82 सामने
रवींद्र जडेजा- 73 सामने
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीही भारतासाठी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 5326 धावा केल्या आहेत. ज्यात 17 शतकांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6707 धावा केल्या आहेत. ज्यात 20 शतकांचा समावेश आहे.
गाबा मैदानावर खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी तिसरा सामना खूप महत्त्वाचा आहे. सध्या पाच कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाने पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत दुसरा सामना 10 गडी राखून जिंकला. आता जो संघ कसोटी सामना जिंकेल तो 2-1 अशी आघाडी मिळवेल.
हेही वाचा-
IND vs AUS: गौतम गंभीरचा ‘खास खेळाडू’ टीम इंडियातून बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल
SMAT; दिल्लीचा धुव्वा उडवत मध्य प्रदेशची फायनलमध्ये एँट्री…!
“जसप्रीत बुमराहमध्ये अनेक दिग्गज गोलंदाजांचे मिश्रण…” माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!