---Advertisement---

पुजाराच्या बाबतीत ‘तो’ निर्णय दिल्याने संजय मांजरेकर आणि ग्लेन मॅकेग्रा यांच्यात वाद

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 12:02 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सध्या सुरू आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी संजय मांजरेकर आणि ग्लेन मॅकेग्रा यांच्यात वाद बघायला मिळाला. हे दोघेही डीआरएसच्या एका निर्णयावर असहमत होते. या निर्णयावर संजय मांजरेकर आणि ग्लेन मॅकेग्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ब्रिस्बेन येथे चौथ्या सामन्यातील पाचवा दिवस सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्या विरुद्ध 18 व्या षटकात नॅथन लायनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलिया संघाने पायचीतची अपील केली होती. मात्र, मैदानावरील पंचाने ही अपील अमान्य करत पुजारा नाबाद दिले होते. पुजाराने पुढे येऊन हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू खूपच फिरला आणि तो बॅट ऐवजी पॅडवर जाऊन आदळला.

ऑस्ट्रेलिया संघाने मैदानावरील पंचाच्या विरुद्धात जाऊन डीआरएस घेतला. या रिप्लेमध्ये असे दिसत होते, अर्ध्या पेक्षा जास्त चेंडू लेग स्टंम्पवर जाऊन आदळत होता. मात्र टीव्ही पंचाने मैदानावरील पंचाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आणि पुजारा नाबाद घोषित केले.

त्यामुळे सोनी सिक्सवर समालोचन करणारे संजय मांजरेकर आणि ग्लेन मॅकेग्रा लंच ब्रेक दरम्यान या मुद्द्यावर आमनेसामने आले. मॅकेग्रा म्हणाले, ” टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट आहे की, चेंडू लेग स्टंम्पवर लागत आहे. चेंडूचा जास्तीत जास्त भाग स्टंम्पवर लागत आहे. जर यानंतर ही फलंदाजाला बाद दिले जात नसेल, तर केव्हा बाद दिले जाणार. माझ्यामते तो पूर्णपणे बाद होता.”

त्यावर बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, असे पहिल्यांदा झाले नाही. जेव्हा अंपायर्स कॉलच्या निर्णयानुसार कोणत्या फलंदाजाला बाद दिले नाही. तसेही डीआरएसमध्ये आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने निश्चित करतो की, कोणता चेंडू स्टंम्पवर लागतो किंवा कोणता लागत नाही. किंवा कोणत्या भागात चेंडू लागतो. जर अशा प्रकरणात काही मिलिमीटरच्या अंतराच्या आधारावर अंपायरचा कोणता निर्णय कायम ठेवला जातो, तर मी त्याचे समर्थन करेल. ”

यानंतर पुजारा 56 धावा करुन डावाच्या 81 व्या षटकात बाद झाला झाला. त्याला पॅट कमिन्सने बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या –

नॅथनच्या चेंडूवर ‘असा’ पकडला स्मिथने शुबमन गिलचा सोपा झेल, पाहा व्हिडिओ

चौथ्या डावात विदेशात नव्वदीत बाद होणारा गिल ठरला चौथा भारतीय, पाहा कोण आहेत अन्य तीन खेळाडू

‘एक हजारी’ रिषभ पंत; एमएस धोनीसारख्या भारतीय दिग्गजालाही टाकलं मागं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---