---Advertisement---

‘एक हजारी’ रिषभ पंत; एमएस धोनीसारख्या भारतीय दिग्गजालाही टाकलं मागं

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 10:46 AM
---Advertisement---

ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा आज (१९ जानेवारी) पाचवा दिवस असून भारतीय संघ दुसऱ्या सत्रापर्यंत ३ बाद १८३ धावांवर आहे. अजून भारताला विजयासाठी १४५ धावांची आवश्यकता आहे. दरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने कसोटी क्रिकेटमधील नवा किर्तीमान मिळवला आहे.

कर्णधार अजिंक्य रहाणेची महत्त्वपुर्ण विकेट गमावल्यानंतर पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानंतर पहिल्या षटकातील अवघ्या तिसऱ्या चेंडूवर दोन धावा करत पंतने कसोटी कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या. या डावात फलंदाजी करण्यापुर्वी पंतने १६ कसोटी सामन्यातील २६ डावात ९९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे कसोटीतील १००० धावांचा आकडा गाठण्यासाठी त्याला फक्त १ धावेची गरज होती.

विशेष म्हणजे, पंत सर्वात जलद कसोटीतील १००० धावा पूर्ण करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. केवळ २७ डावात पंतने कसोटी कारकिर्दीतील १००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह मोठमोठ्या भारतीय दिग्गजांना त्याने पिछाडीवर सोडले आहे.

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी याने ३२ कसोटी डावात कसोटी कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या होत्या. परंतु आता ३० पेक्षाही कमी डावात हा पराक्रम करत पंत महान यष्टीरक्षक फलंदाज धोनीवरही वरचढं ठरला आहे.

धोनी व्यतिरिक्त फारुख इंजिनिअर, नयन मोंगिया, सय्यद किरमानी आणि किरण मोरे या माजी यष्टीरक्षकांनी ५० आणि त्यापेक्षा कमी कसोटी डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. तर सक्रिय भारतीय यष्टीरक्षकांमध्ये पंतशिवाय फक्त वृद्धिमान साहा हा पराक्रम करु शकला आहे.

सर्वात जलद कसोटीतील १००० धावा पूर्ण करणारे भारतीय यष्टीरक्षक-

२७ डाव- रिषभ पंत
३२ डाव- एमएस धोनी
३७ डाव- वृद्धिमान साहा
३९ डाव- नयन मोंगिया
४५ डाव- सय्यद किरमानी
५० डाव- किरण मोरे

पंत ठरला पहिला भारतीय यष्टीरक्षक

एवढेच नव्हे तर, कसोटीत पंत सर्वात जलद ५० विकेट्स घेणारा भारतीय यष्टीरक्षकही आहे. त्याने २२ डावात यष्टीमागे ५० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : शेवटच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर भारताच्या ३ बाद १८३ धावा; पुजाराची अर्धशतकाकडे वाटचाल…

‘गिल है की मानता नही!’ विरूकडून खास अंदाजात शुबमनचं कौतुक

क्या सोचा था, क्या हो गया..! रिव्ह्यू चुकल्यानंतर ऑसींनी धरलं डोकं, पाहा तो मजेदार क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---