भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बाॅर्डर गावस्कर मालिकेतील शेवटचा सामना आज (03 जानेवारी) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. ज्यात पुन्हा एकदा भारतीय संघाची वरची फळी फ्लाॅप ठरली आहे. ज्यामध्ये कोहलीचा देखील समावेश आहे. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप झाला आहे. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराट अत्यंत खराब शॉट खेळून बाद झाला.
सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. अवघ्या 17 धावांवर संघाचे दोन्ही सलामीवीर बाद झाले. दोघेही केएल राहुल 4 तर यशस्वी जयस्वाल 10 धावा करुन बाद झाले. यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली संघाला सावरले. त्यांनी लंचब्रेकपर्यंत 40 धावा जोडल्या, मात्र लंच ब्रेकपूर्वी शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शुबमन गिल खराब शाॅट खेळायच्या नादात बाद झाला. त्याने 64 चेंडूत 20 धावा केल्या. लंचपर्यंत भारत 57-3 अश्या स्थितीत होता. क्रीझवर विराट कोहली नाबाद 12 धावांवर होता.
Virat Kohli dismissed for 17 in 69 balls. pic.twitter.com/WCazGDk2iB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 3, 2025
लंचब्रेकनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात होताच भारताला विराट कोहलीच्या रुपाने चाैथा धक्का बसला. विराट पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या चेंडूवर बाद झाला. स्काॅट बोलंडने त्याला तंबूत पाठवले. विराट आज चांगल्या लयीत खेळताना दिसत होता. ज्यात त्याने स्वत:वर संयम राखत ऑफ साईडचे चेंडू सोडत होता. त्याने डावात 69 चेंडू खेळल्या पण शेवटी पुन्हा तो ऑफ स्टंपच्या चेडूंवर स्लीपवर बाद झाला. तो 17 धावा करुन बाद झाला.
तत्तपूर्वी टीम इंडियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा नियमीत कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती दिल्याने जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या मालिकेत ऑस्ट्रेलिया पुढे असून भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. अश्या स्थितीत मालिकेत बरोबरी आणि डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत जिंवत राहयचे असल्यास हा सामना जिंकणे गरजेचे आहे.
हेही वाचा-
IND vs AUS; ‘रोहित शर्मा’ला विश्रांती की खराब फॉर्ममुळे प्लेईंग 11 मधून वगळले?
IND vs AUS: रोहित बाहेर, या अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
बीसीसीआयमध्ये जय शाह यांची जागा कोण घेणार? सचिवपदाच्या शर्यतीत हे नाव आघाडीवर