मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 ने गमावल्यानंतर भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे. बांग्लादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा वाढवल्या होत्या. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर समीकरण पूर्णपणे बदलले. भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली असती. तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोन विजय पुरेसे ठरले असते.
मात्र या पराभवाने भारतीय संघाची अंतिम फेरी गाठण्याचे सारे गणितच बिघडले. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरली असून अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना चार सामने जिंकावे लागतील. अशा स्थितीत भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 4-0 ने जिंकली तर इतर संघांच्या निकालावर अवलंबून न राहता अंतिम फेरी गाठता येईल. पण निकाल उलट झाल्यास भारताला नशीबावर अवलंबून राहावे लागेल.
भारतीय संघ यापूर्वी दोनदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यशस्वी ठरला आहे आणि टीम इंडिया पुन्हा एकदा हा पराक्रम करेल आणि विजयाची हॅट्ट्रिक करेल अशी चाहत्यांना आशा आहे. मात्र ही मालिका सुरू होण्याआधीच माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे.
जेव्हा सुनील गावस्कर यांना विचारण्यात आले की भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल का, तेव्हा त्यांनी बोलताना म्हणाले “नाही, मला असे वाटत नाही. वास्तविक, भारत ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवणार नाही. पण असे झाले तर मला खूप आनंद होईल. पण भारत 3-0 ने जिंकू शकतो. आता फक्त ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याचा प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित करा.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची शेवटची चार कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. यातील दोन मालिका ऑस्ट्रेलियात झाल्या. 10 वर्षांपूर्वी 2014/15 हंगामात ऑस्ट्रेलियाने भारताला कसोटी मालिकेत पराभूत केले होते.
हेही वाचा-
IND VS AUS; भारताच्या कमकुवतपणाचा फायदा ऑस्ट्रेलिया घेणार! हा फिरकी गोलंदाज ठरणार गेमचेंजर
‘… तर त्याला कर्णधार नाही तर खेळाडू म्हणून सहभागी करा’, माजी दिग्गजाची रोहित शर्माबाबत मोठी प्रतिक्रिया
“फिरकी गोलंदाजी खेळण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे….” इंग्लंडच्या माजी कर्णधारानं टीम इंडियाला डिवचलं