---Advertisement---

स्टार्कशी पंगा नको रे बाबा! पर्थ कसोटीत स्लेज करणारा जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद

---Advertisement---

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वालची विकेट घेत भारतीय संघाला मोठा धक्का दिला.

पर्थ कसोटीप्रमाणेच या सामन्यातही यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही सलामी जोडी भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी आली. शेवटच्या कसोटी सामन्यातील शतकवीर जयस्वालकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु मिचेल स्टार्कनं ती उधळून लावली. ऑस्ट्रेलियासाठी पहिलं षटक टाकणाऱ्या स्टार्कनं षटकातील पहिल्याच चेंडूवर जयस्वालला एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

स्टार्कनं चेंडू मिडल लेग लाइनला टाकला, ज्याला जयस्वाल फ्लिक करायला गेला, मात्र त्याची लाइन चुकली. चेंडू सरळ जाऊन पॅडवर आदळला. जयस्वालनं केएल राहुलला डीआरएस घेण्याबाबत विचारलं, परंतु राहुलनं या युवा फलंदाजाला रिव्ह्यू न घेण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे जयस्वाल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

पर्थ कसोटीत यशस्वी जयस्वालनं मिचेल स्टार्कला स्लेज केलं होतं. स्टार्कचा चेंडू खूप हळू येत आहे, असं जयस्वाल म्हणाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता स्टार्कनं जयस्वालला पहिल्या चेंडूवर बाद करून त्याला जोरदार उत्तर दिल्याचं चाहते म्हणत आहेत. विशेष म्हणजे, पर्थ कसोटीच्या पहिल्या डावातही जयस्वाल शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात त्यानं दमदार पुनरागमन करत 161 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. त्यामुळे या कसोटीच्या दुसऱ्या डावातही तो पुनरागमन करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा – 

IND vs AUS; गुलाबी चेंडू टीम इंडियासाठी डोकेदुखी, पाहा आतापर्यंतचा रेकॉर्ड!
6 डिसेंबरला जन्मलेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, जसप्रीत बुमराहसह अनेक दिग्गजांचा समावेश
ख्रिस गेल किंवा मॅक्सवेल नाही तर या फलंदाजाच्या नावावर सर्वात लांब षटकाराची नोंद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---