---Advertisement---

भारतासाठी धोक्याची घंटा! ऑस्ट्रेलियाने मायदेशाहून बोलावला हुकमी एक्का, कोण आहे तो?

On: शनिवार, फेब्रुवारी 11, 2023 5:32 PM
Australia-Cricket-Team
---Advertisement---

भारतीय संघाने नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. सामना संपल्यानंतर भारतीय संघाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ही माहिती ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने दिली आहे. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना कमिन्सने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाविषयी महत्त्वाची माहिती दिली.

काय म्हणाला पॅट कमिन्स?
पॅट कमिन्स (Pat Cummins) याने ऑस्ट्रेलियाचा घातक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) दिल्लीत पोहोचला (Mitchell Starc Arrived In Delhi) असल्याची माहिती दिली आहे. तो म्हणाला की, “मिचेल स्टार्क आज दिल्लीत पोहोचला. जॉश हेजलवूड हा दिल्ली कसोटीसाठी तयार नसेल. कॅमेरून ग्रीनबाबत आम्हाला खात्री नाहीये. येत्या दोन दिवसात आम्हाला गोष्टी पाहाव्या लागतील.”

मिचेल स्टार्कची दुखापत
मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत स्टार्कला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही खेळता आले नव्हते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारादरम्यान होस्टने स्टार्कला त्याच्या दुखापतीविषयी विचारले होते. त्यावेळी 33 वर्षीय स्टार्क म्हणाला होता की, “मी अजूनही काही आठवडे उपचार घेत आहे. तसेच, कदाचित दिल्ली येथे आमच्या संघ सहकाऱ्यांना भेटेल. आशा आहे की, पहिला कसोटी सामना जिंकून तिथे मी सराव करू शकेल.”

दुसरा कसोटी दिल्लीत
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला तिन्ही विभागात अपयशाचा सामना करावा लागला. 7 विकेट्स घेणाऱ्या टॉड मर्फी याला वगळले, तर इतर एकाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला भारतीय फलंदाजांना घाम फोडता आला नाही. अशात स्टार्कच्या संघात परतल्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजीला धार मिळेल, असे बोलले जात आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. (IND vs AUS Delhi Test Pat Cummins confirms Mitchell Starc arrives in Delhi today)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या विजयांमध्ये सर्वात मोठे योगदान अश्विनचेच, भज्जी अन् झहीर खान तर लईच लांब
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनचे अनोखे विक्रमी ‘शतक’, यादीत ‘हा’ भारतीय दिग्गजच टॉपर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---