भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया-अ आणि भारत-अ यांच्यात दुसरा अनधिकृत कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात अनेक भारतीय खेळाडूही खेळत आहेत. ज्यांना 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या या सामन्यात, एका फलंदाजाने पर्थ येथे खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत शानदार खेळी खेळून भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याचा दावा केला आहे.
ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांपैकी एका सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे कर्णधार रोहित शर्मा मुकु शकतो. तसे त्याने बीसीसीआयला कळवले आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. अशी शक्यता आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला, तर प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर मोठी कोंडी होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कठीण खेळपट्ट्यांवर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्या धगधगत्या चेंडूंसमोर कोणता फलंदाज भारताचा सलामीवीर बनणार हे संघ व्यवस्थापनाला ठरवावे लागेल.
ध्रुव जुरेल हा तांत्रिकदृष्ट्या इतका मजबूत फलंदाज आहे की रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याला यशस्वी जयस्वालसह सलामीसाठी मैदानात उतरवले जाऊ शकते. ध्रुव जुरेलने आज गुरुवारी ऑस्ट्रेलिया-अ विरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात 186 चेंडूंचा सामना करत 80 धावांची खेळी खेळली. मेलबर्नच्या उसळत्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अजिबात सोपे नव्हते, पण ध्रुव जुरेलने आपले तंत्र आणि स्वभाव अतिशय चांगल्या प्रकारे दाखवून दिला. ऑस्ट्रेलिया-अ विरुद्धच्या या सामन्यात भारत-अ संघ पहिल्या डावात अवघ्या 161 धावांत गारद झाला.
या सामन्यात ध्रुव जुरेलने संपूर्ण भारत-अ संघाच्या 50 टक्के धावा एकट्याने केल्या. ध्रुव जुरेलने 186 चेंडूत 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. ध्रुव जुरेलने ही खेळी सहाव्या क्रमांकावर खेळली. याच सामन्यात केएल राहुल केवळ 4 धावा करून बाद झाला. केएल राहुलचा खराब फॉर्म आणि रोहित शर्माची अनुपस्थिती लक्षात घेता, पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलला सलामी देणे योग्य ठरेल. ध्रुव जुरेलही विकेटकीपिंग करतो.
हेही वाचा-
श्रेयस अय्यरची बॅट पुन्हा तळपली, ओडिशाविरुद्ध शानदार द्विशतक, निवड समीतीचे डोळे उघडणार?
IND VS SA; दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचा दबदबा, असा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड
“सातत्याचा अभाव….”, संजू सॅमसनच्या फॉर्मबाबत अनिल कुंबळेची मोठी प्रतिक्रिया