मुंबई। भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना चमकदार कामगिरी केली आहे. बडोद्याकडून खेळताना त्याने या सामन्यात मुंबईच्या पहिल्या डावात 81 धावा देत 5 विकेट्स घेतल्या तसेच अर्धशतकी खेळीही केली आहे.
यावेळी हार्दिकने 137 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. त्यात त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. याआधी त्याने मुंबईच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या आहेत. दोन्ही वेळेला हार्दिकने मुंबईचा सलामीवीर आदित्य तरेला बाद केले आहे.
हार्दिकच्या या अष्टपैलू खेळीमुळे त्याचे भारतीय कसोटी संघात स्थान पक्के झाले असून त्याचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे.
त्यामुळे हार्दिक सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पुढील सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. याबद्दल “हार्दिक आमच्या पुढील होणाऱ्या सामन्यात खेळणार नसून तो ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे”, असे बडोदा संघाचा कर्णधार केदार देवधर म्हणाला.
हार्दिकची न्युझीलंडमधील वन-डे सामन्यात इंडिया ए संघात निवड झाली होती. मात्र त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास रूची दाखवली.
मुंबई विरुद्ध बडोदा सामना अनिर्णित राहिला. हा सामना बघण्यासाठी राष्ट्रीय संघवनिवड अधिकारी सरनदिप सिंगही उपस्थित होते. तर त्यांनी हा सामना संपल्यावर हार्दिकशी चर्चा केली.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. वरिष्ठ संघातून तीन महिने दुखापतीमुळे बाहेर असलेल्या हार्दिकने जबरदस्त पुनरागमन करत अष्टपैलू खेळी केली आहे.
हार्दिक बरोबरच मयंक अगरवालचाही भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मयंकला दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ ऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. शॉ डाव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
UPDATE: @hardikpandya7 and @mayankcricket added to #TeamIndia's Test squad. #AUSvIND
Details: https://t.co/rWndXYJ2eN pic.twitter.com/t20hXpwNBH
— BCCI (@BCCI) December 17, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–मोठी बातमी: भारताला मोठा धक्का, पृथ्वी शॉ कसोटी मालिकेला मुकणार
–Video: आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मुरली विजयला कोहलीबद्दल असे काही बोलला की ऐकून थक्क व्हाल!
–कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी
–युवराजचा टी२० विक्रम थोडक्यात वाचला, शाय होपची षटकार-चौकारांची बरसात