---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताचे पारडे जड, पण ‘हे’ आकडे पाहून वाढले चाहत्यांचे टेंशन

IND vs AUS
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंगळवारी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी खेळली सुरू होणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील प्रदर्शनानंतर संघ व्यवस्थापनाला त्यांच्यातील कमी समजू शकेल. दोन्ही संघांनी यापूर्वी देखील अनेकदा एकमेकांविरुद्ध टी-20 मालिका खेळल्या आहेत. चला तर एक नजर टाकूया या संघांच्या यापूर्वीच्या आकडेवारीवर. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील यापूर्वीच्या आकडेवारीचा विचार केला, तर टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे पारडे थोडे जड दिसते. परंतु मागच्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला त्यांच्याच मायदेशात पराभवाची धुळ चारली आहे, जी भारतीय संघासाठी चिंतेची बाब असेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 13 सामन्यांमध्ये भारत, तर 9 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ जिंकला होता. राहिलेल्या एका सामन्याचा निकाल लागू शकला नाव्हता. या सामन्यांपैकी 7 सामने भारतात खेळले गेले. मायदेशात भारतीय संघाने 4 विजय मिळवले, तर तीन सामन्यांमध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिली.

ऑस्ट्रेलियाने भारतीय धरतीवर केलीये विजयाची हॅट्रिक –
ऑस्ट्रेलियाने भारतात खेळलेल्या मागच्या तीन टी-20 सामन्यांमध्ये सलग विजय मिळवले आहेत, जी भारतीय संघासाठी लाजिरवाणी बाब आहे. या तीन विजयांपैकी पहिली विजय 2017 मध्ये मिळवला होता. ऑस्ट्रेलिया संघ तेव्हा भारत दौऱ्यावर आणि टी-20 मालिकेतील दुसरा सामना भारताने 8 विकेट्सने गमावली. त्यानंतर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यात पुन्हा एक टी-20 मालिका खेळली. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना 3 विकेट्सने, तर दुसरा सामना 7 विकेट्सने ऑस्ट्रेलियाने नावावर केला. असे असले तरी, यावर्षी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ या तीन पराभवांची कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात असेल.

भारत और ऑस्ट्रेलिया की टीमें-

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया- एरोन फिंच (कर्णधार), पैट कमिंस (उपकर्णधार), एश्टन एगर, टिम डेविड, जोश हेजलवुड, जोश इंगलिस, ग्लेन मैक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, कैमरून ग्रीन, एडम जम्पा, नाथन एलिस, डेनियल सेम्स, सीन एबॉट.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

‘तेव्हा’ युवरज बनला सिक्सर किंग! वाद फ्लिंटॉफचा पण किंमत मोजावी लागली स्टुअर्ट ब्रॉडला
भारतीय संघासाठी मोठी बाधा ठरणार पॅट कमिन्स! म्हणतोय, ‘विश्रांतीनंतर आता…’
VIDEO: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी थिरकले हार्दिक-विराट; तुम्हालाही आवडेल डान्स

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---