---Advertisement---

बुमराहमुळे चाहत्यांना आठवली 2003 वर्ल्डकप फायनल, वेगवान गोलंदाजाची आकडेवारी चिंता वाढवणारी

On: रविवार, नोव्हेंबर 19, 2023 6:56 PM
Jasprit Bumrah
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 50 षटकात 240 धावांपर्यंत मजल मारू शकता. प्रत्युत्तरात भारताने ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट स्वस्तात मिळवली, पण तसेच संघाची चिंता वाढवणारी एक आकडेवारी समोर येत आहे.

भारतीय संघासाठी विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी अर्धशतकी खेली केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही 47 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. पण संघातील इतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. 241 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या षटकात 15 धावा मिळवला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने हे षटक टाकले होते.

जसप्रीत बुमराहचे हे षटक पाहिल्यानंतर अनेकांना 2003 विश्वचषकाचा अंतिम सामना आठवला. या सामन्यातही भारतासाठी पहिले षटका टाकणाऱ्या झहीर खान याने 15 धावा खर्च केल्या होत्या. बुमराहने आता 20 वर्षांनंतर 2023 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या आहेत. ही आकडेवारी भारताची डोकेदुखी वाढवणारी आहे. कारण अनेकजण सामन्याच्या निकालासोबत याची बोरोबरी करत आहेत. 2003 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 125 धावांनी मात दिली होती. अशात यावर्षीचा विश्वचषक भारताला जिंकता येणार की नाही, अशी शंका चाहत्यांमधून उपस्थित होत आहे.  (IND vs AUS Jasprit Bumrah’s statistics in the first over are raising concerns)

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड

महत्वाच्या बातम्या – 
CWC 2023 । फायनलमध्ये अर्धशतक करणाऱ्या विराटचा नवा विक्रम, महान फलंदाजाला टाकले मागे
World Cup Final मध्ये भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो! विश्वविजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---