भारताविरुद्ध चार कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड रविवारी भारतीय फलंदाजांना इशारा देताना म्हणाला आहे की, त्यांचा संघ निश्चितपणे भारताविरुध्द अखुड टप्प्याच्या चेंडूची रणनितीवर भर देईल. 17 डिसेंबर पासून चार सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र गुलाबी चेंडूवर खेळला जाणार आहे.
“आखूड टप्प्याच्या चेंडूंची रणनिती”
ऑस्ट्रेलिया जवळ गुलाबी चेंडूच्या क्रिकेटचा सर्वोत्तम अनुभव आहे. कारण आतापर्यंत झालेल्या गुलाबी चेंडूच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एकदाही पराभव झालेला नाही. जोश हेझलवूड म्हणाला, “मला वाटते की वेगवेगळ्या वेळेवर, हो, आखूड टप्प्याच्या चेंडूचा वापर एक रणनिती म्हणून केला जाईल. हा खेळाचा एक भाग आहे.” रविवारी जोश हेझलवूड एक आभासी पत्रकारपरिषदेत म्हणाला, “ऑस्ट्रेलियात इतर देशाच्या तुलनेत धावपट्टीवर गती आणि उसळी घेणारे चेंडू असतात,आणि खेळपट्टी वेळोवेळी सपाट पण असू शकते. यासाठी, जर आम्हाला खोल टप्प्याच्या चेंडूंवर परिणाम नाही मिळाले तर आम्ही बाऊंसर आणि डाव्या बाजूच्या क्षेत्ररक्षणा बरोबर वेगवेगळ्या वेळेवर फलंदाजांना आव्हान देवू. हा नेहमीच आमच्या रणनीतीचा भाग राहिला आहे. ”
“विराटला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज”
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडून देण्यात येणाऱ्या पितृत्व रजेवर जाण्यापूर्वी विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. जोश हेझलवूडने विराट कोहलीला चार वेळा (3 वनडेत आणि एका टी-20) बाद केले आहे. विराटच्या आणि त्याच्यातील हेझलवूडला विचारल्यावर, तो म्हणाला, “त्याच्याविरुद्ध पांढर्या चेंडूंच्या प्रकारात उशिरा येण्याचे भाग्य लाभले. यासाठी, तुम्ही पुढच्या प्रकारात समजून घेवू शकता.”
जोश हेझलवूड म्हणाला, “ही एक नवीन सुरुवात आहे. या गुलाबी चेंडूसोबत पुन्हा एकदा नवीन गोष्ट आहे. त्याने मागील दौऱ्यात लाल चेंडूवर आमच्या विरुद्ध धावा काढल्या होत्या आणि मला वाटतं आहे कि त्याच्याविरुद्ध चांगली सुरुवात करावी लागेल. मागल्या वेळेस आम्ही फक्त दोन डावात भेटलो आहोत.”
2018-19 साली भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केले होते. हे पहिल्यांदा घडले होते की भारताने त्यांना त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत केले होते. या दौऱ्यात चेतेश्वर पुजाराने महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचे डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ चेंडूशी छेडछाड प्रकरणी बाहेर होते.
संबधित बातम्या:
– भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात मोठ्या खेळाडूचे पुनरागमन; फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यास सज्ज
– भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास सज्ज, कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे वक्तव्य
– कसोटी मालिकेत स्लेजिंग तर होणारच! ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे विधान