---Advertisement---

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 9:21 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारी पार पडली. या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 3 विकेट्सने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. त्याचबरोबर भारतीय संघाने बॉर्डर गावसकर मालिका सुद्धा 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यामुळे भारतीय संघ जल्लोष करत आहे. ‘जीत का जश्न जरूर मनाएं, लेकिन हमसे सावधान रहे’ असे केविन पीटरसन सोशल मीडियाच्या माध्यामातून भारतीय संघाला हिंदीतून इशारा दिला आहे.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने विजयासाठी चौथ्या सामन्यात 328 धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान भारतीय संघाने 96.6 षटकांत 7 गडी गमावून 329 धावा करून पूर्ण केले. त्यामुळे भारतीय संघ साध्या विजयाचा जल्लोष करत आहे. त्यावर इंग्लंडचे माजी खेळाडू केविन पीटरसनने भारतीय संघाला आगामी इंग्लंड विरुद्ध होणार्‍या कसोटी मालिकेपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यामातून हिंदीत ट्विट करत इशारा दिला आहे.

केविन पीटरसनने ट्विट करताना लिहले की, “भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करावा. कारण हा विजय सर्व अडचणीवर मात करून मिळाला आहे.” त्यांनंतर त्याने पुढील ओळीत भारतीय संघाला आगामी इंग्लंड विरुद्ध होणार्‍या कसोटी मालिकेची आठवण करून देताना लिहले आहे की, “परंतु खरा संघ काही आठवड्यानंतर येत आहे. त्याला तुमच्या घरात पराभूत करावे लागेल.”

त्याचबरोबर त्याने पुढे भारतीय संघाला सावध करताना लिहले की, “सतर्क रहा. दोन आठवड्यात जास्त जल्लोष करण्यापासून सावध राहा.” त्याचबरोबर हसण्याचे इमोजी जोडले आहेत. एक प्रकारे केविन पीटरसनने हसत-हसत भारतीय संघाला इंग्लंडला हरवण्याचे आव्हान दिले आहे.

https://twitter.com/KP24/status/1351501549013504001?s=19

भारत आणि इंग्लंड संघात चार सामन्याची कसोटी मालिका 5 फेब्रुवारी पासून खेळली जाणार आहे. त्यासाठी इंग्लंड संघ भारतीय दौर्‍यावर येणार आहे. इंग्लंड संघ फेब्रुवारी मध्ये भारतात दाखल होईल. कसोटी मालिका संपल्यानंतर भारत इंग्लंड संघात 5 सामन्याची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यांनंतर दोन्ही संघात 3 वनडे सामन्याची मालिका खेळली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्ध चेन्नईत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराटसह या खेळाडूंचे पुनरागमन

एक घाव अन् दोन तुकडे! भारताने आत्तापर्यंत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑसी संघांचे ‘एवढे’ विश्वविक्रम केलेत खंडित

‘मार बसला तरी आपण नेटाने उभा राहिलो’, क्रिकेटच्या देवाकडून संघाचं खास शब्दात कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---