---Advertisement---

‘या’ फलंदाजांचे व्हिडिओ पाहून केएल राहुलने फलंदाजीत केली कमाल…

On: रविवार, जानेवारी 19, 2020 10:00 AM
---Advertisement---

भारतीय संघात मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी भारताचा फलंदाज केएल राहुलने भारताचा कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सनचा व्हिडिओ पाहून स्वत:ला तयार केले आहे.

विराट, स्मिथ आणि विलियम्सन हे तिघेही फलंदाज मधल्या फळीत फलंदाजी करतात. तर राहुल हा प्रामुख्याने सलामीला फलंदाजी करतो. मात्र सध्या शिखर धवन आणि रोहित शर्मा हे भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजी करत असल्याने राहुलला मधल्या फळीत खेळावे लागत आहे.

शुक्रवारी(17 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 52 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला 340 या मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाला की, “मला नाही वाटत की तांत्रिकरित्या मी वेगळ्या पद्धतीने सराव केला आहे. मी फक्त मधल्या फळीतील फलंदाजांबरोबर चर्चा केली. तसेच खूप सारे व्हिडिओही पाहिले. त्याचबरोबर मी विराटसोबत चर्चा केली. तसेच एबी डिविलियर्स आणि स्टीव्ह स्मिथ हे खेळाडू कशाप्रकारे आपली खेळी सांभाळतात याचे व्हिडिओ पाहिले.”

“मी केन विलियम्सनचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याचे व्हिडिओ पाहिले आणि तो त्याच्या खेळीला पुढे कसे घेऊन जातो हे जाणून घेतले. मी ही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की मी काही विशेष परिस्थितींमध्ये कशाप्रकारे चांगली कामगिरी करू शकतो,” असेही राहुल यावेळी म्हणाला.

राहुलने पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याचबरोबर त्याने यावेळी 61 चेंडूत 47 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---