ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज(15 जानेवारी) दुसरा वनडे सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात खलील अहमद ऐवजी मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात त्याने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यातून सिराजने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो वनडे पदार्पण करणारा भारताचा 225 वा खेळाडू ठरला आहे. मात्र यावेळी त्याने 10 षटके टाकताना तब्बल 76 धावा दिल्या.
पदार्पणाच्या सामन्यात एखाद्या भारतीय खेळाडूने सर्वाधिक धावा देण्यामध्ये सिराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचबरोबर त्याने 18 वर्षाचा विक्रमही मोडला आहे.
सिराज आधी करसन घावरी यांनी 1975ला इंग्लंड विरुद्ध वन-डे मध्ये पदार्पण करताना 83 धावा दिल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांनी11 षटके टाकली होती. घावरी नंतर अमित भंडारीने ढाकामध्ये पाकिस्तान विरुद्ध 75 धावा दिल्या होत्या.
वन-डे प्रमाणेच टी20 सामन्याच्या पदार्पणात सर्वाधिक धावा देणाऱ्यांमध्ये सिराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2017ला न्यूझीलंड विरुद्ध टी20 मध्ये पदार्पण करताना 53 धावा देत 1 विकेट घेतली होती. त्याच्याआधी जोगिंदर शर्माने 2007ला पदार्पण करताना 57 धावा दिल्या होत्या.
भारताकडून वन-डे मध्ये पदार्पणात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज
83 धावा- करसन घावरी, इंग्लंड विरुद्ध (1975, लॉर्ड्स- 11 षटके)
76 धावा- मोहम्मद सिराज, ऑस्ट्रेलिया विरुद्ध (2019, एडलेड)
75 धावा- अमित भंडारी, पाकिस्तान विरुद्ध (2000, ढाका)
महत्त्वाच्या बातम्या-
–रोहित आऊट तर झाला पण इतिहासात कायमच नाव कोरुन
–…म्हणून धोनी आणि या गोलंदाजांचे नाते आहे खास!
–जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ