---Advertisement---

‘तो चांगल्या स्वभावाचा…’, दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज मोहम्मद सिराजचा मोठा चाहता

On: मंगळवार, डिसेंबर 10, 2024 10:57 AM
Mohammad-Siraj
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडसोबत झालेल्या वादात मोहम्मद सिराजची आक्रमक वृत्ती चर्चेचा विषय बनली आहे. हेडशी झालेल्या वादानंतर आयसीसीने सिराजवर कारवाई केली आहे. सिराजला मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंटची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र असे असूनही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने त्याला चांगला माणूस म्हटले आहे. जोश हेझलवूड म्हणाला, सिराज खेळाविषयी उत्साही आहे आणि विराट कोहलीप्रमाणे प्रेक्षकांना उत्तेजित करण्याची क्षमता त्याच्यात आहे.

सिराजने ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा आक्रमक वर्तन दाखवले होते. दुसऱ्या डे नाईट टेस्ट मॅचमध्ये भारताचा 10 विकेट्सनी पराभव झाला.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज हेझलवूड म्हणाला की, तो चांगल्या स्वभावाचा माणूस आहे. कधी कधी त्याला पाहून बरे वाटते. हेजलवुडने इंडियन प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघातील सिराजसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. तो म्हणाला, मी आरसीबीमध्ये सिराजसोबतचा माझा वेळ खरोखरच एन्जॉय केला आहे. तो कदाचित काही प्रमाणात भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करतो, त्याचं व्यक्तिमत्त्व थोडं विराट कोहलीसारखे आहे. तो खूप भावनिक आहे आणि प्रेक्षकांना उत्तेजित करण्याची क्षमता त्याच्यात आहे. गेल्या काही वर्षांत त्याने आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे.

हेजलवूड दुखापतीमुळे ॲडलेड कसोटी सामना खेळू शकला नाही. त्याने पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या डावात कोहलीला पाच धावांवर बाद केले होते. पहिल्या कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्याने सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दुखापती असल्यामुळे तो दुसऱ्या पिंक बाॅल कसोटीत मूकला होता. दरम्यान आता तिसऱ्या गाबा कसोटीसाठी त्याची संघात निवड होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत आणखी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा-

गाबा मैदानावर आतापर्यंत हे 4 भारतीयचं शतक करण्यात यशस्वी, शेवटची सेंच्युरी 10 वर्षापूर्वी आलेली
केएल राहुलच्या जागी रोहितने सलामी करावी, या दोन दिग्गजांचा भारतीय कर्णधाराला सल्ला
नितीश रेड्डीने मोडला सेहवागचा विश्वविक्रम, फक्त 2 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत केला मोठा चमत्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---