भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. त्यानंतर टीम इंडिया समोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान आहे. कारण 22 नोव्हेंबरपासून दोन्ही देशांमधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. त्याच बाबतीत आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला कधी जाणार आणि कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय संघ 10 नोव्हेंबरला पर्थला रवाना होऊ शकतो. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. पण संघात कोणत्या खेळाडूंना स्थान दिले जाणार हाही मोठा प्रश्न आहे. भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना उद्यापासून पुण्यात खेळवला जाणार आहे. त्यानंतर निवड समिती बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी बैठक घेणार आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नितीशकुमार रेड्डीचे नाव आघाडीवर आहे. नितीशने आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 13 सामन्यात 303 धावा केल्या होत्या. अलीकडेच त्याने भारताकडून पदार्पण करताना बांग्लादेशविरुद्धच्या टी20 सामन्यात 74 धावांची खेळी खेळून खळबळ उडवून दिली होती. या अहवालानुसार मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि त्यांची टीम नितीशला वेगवान गोलंदाजीचा पर्याय म्हणून तयार करू इच्छित आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची एक लांबलचक मालिका होणार असल्याने भारतीय संघासोबत अनेक नेट गोलंदाज पाठवण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे.
शार्दुल ठाकूरचा देखील टीम इंडियाच्या संघात समावेश केला जाऊ शकतो. ज्याने 2022 मध्ये गाब्बा येथे झालेल्या सामन्यात एकूण 7 विकेट्स घेऊन आणि 67 धावांची इनिंग खेळून भारताच्या विजयात मोठे योगदान दिले होते. काही महिन्यांपूर्वी मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यातही ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. वेगवान गोलंदाजीच्या भूमिकेसाठी ठाकूर आणि नितीश यापैकी एकाची निवड केली जाऊ शकते.
हेही वाचा-
संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू पुढील सामन्यातून बाहेर!
“बबिताला बृजभूषण सिंगचे पद मिळवण्याची लालूच होती, म्हणून…”, साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
वाईट प्रदर्शनानंतरही सिराजला पुणे कसोटीत मिळणार संधी? सहाय्यक प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य