भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल मागील काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करतोय. त्यामुळे त्याला क्रिकेट प्रेमी, क्रीडा विश्लेषकांपासून ते आजी-माजी दिग्गजांपर्यंत अनेकांकडून ट्रोल केले जात आहे. नुकतेच माजी भारतीय गोलंदाज वेंकटेश प्रसाद याने त्याच्या संघातील जागेवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, त्याला कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पाठिंबा मिळाला. सातत्याने उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर आता द्रविड यांनी मौन सोडले आहे.
एकीकडे कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने म्हटले आहे की, तो ‘प्रतिभावान खेळाडूं’ना पाठिंबा देत राहील. दुसरीकडे, राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना वाटते की, केएल राहुल (KL Rahul) याला त्याच्या खेळावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. दिल्ली येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीनंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना द्रविड यांनी राहुलला ‘भारताचा सर्वात यशस्वी विदेशी सलामी फलंदाजांपैकी एक’ म्हटले.
‘हा एक टप्पा आहे’
राहुल द्रविड म्हणाले की, “मला वाटते की, त्याला त्याच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. हा फक्त एक टप्पा आहे, तो आमचा सर्वात यशस्वी विदेशी सलामी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये शतक ठोकले आहे. आम्ही त्याला पाठिंबा देत राहू. माझा विश्वास आहे की, त्याच्याकडे गुणवत्ता आणि दर्जा दोन्ही आहे. याच्यासोबत काम करणे चांगले आहे. मात्र, क्रिकेट प्रकाराचे व्यवस्थापन करणे सर्वात कठीण भाग आहे. मी त्याला जास्त तांत्रिक प्रशिक्षण देत नाही. फक्त सामान्य चर्चा आणि त्याला आव्हान द्यायला आवडतात.”
‘दिल्लीसारख्या खेळपट्टीवर खेळायला शिकलं पाहिजे’
दुसरीकडे, रोहित शर्माने राहुलकडे आग्रह केला की, त्याने दिल्लीसारख्या खेळपट्टीवर खेळायला शिकले पाहिजे. तो म्हणाला, “निश्चितरीत्या जेव्हा तुम्हा अशा खेळपट्टीवर खेळत आहात, तेव्हा तुम्हाला धावा करण्यासाठी स्वत:ची पद्धत शोधण्याची गरज आहे. वेगवेगळे व्यक्ती या संघाचा भाग आहेत आणि त्यांच्याकडे धावा करण्याची वेगवेगळी पद्धत असेल. त्यामुळे धावा करण्याच्या आपापल्या पद्धती शोधा. एक व्यक्ती काय करत आहे, यावर सर्व लक्ष द्यायचे नाहीये. कारण, हे सर्व संघाबद्दल आहे. आमच्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. राहुलबाबत हेच माझे विचार आहेत.”
अशात म्हटले जात आहे की, राहुलच्या खराब फॉर्ममुळे भारतीय कसोटी संघात सलामीच्या दुसऱ्या स्थानासाठी शुबमन गिल (Shubman Gill) याची त्याच्यासोबतची स्पर्धा आणखी कडक होणार आहे. (ind vs aus on pitches like delhi coach rahul dravid breaks silence on kl rahul flop show read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिलदार विराट! एका नाही, तर वृद्धाश्रमातील 52 आजी-आजोबांना भेटून रडलेला कोहली; वाचून तुम्हीही व्हाल भावूक
बोंबला! उपकर्णधारपद तर गेलंच, आता कर्णधारपदही जाणार? आयपीएलमध्ये ‘हे’ 2 खेळाडू घेऊ शकतात राहुलची जागा