भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 26 डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. ऍडलेड येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ आनंदात आहे. परंतु या संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ मात्र या ख्रिसमसच्या सणाला त्याची इच्छा पूर्ण होणार नसल्याने दु:खी आहे.
शेवटची भेट झाली होती ऑगस्टमध्ये
ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने जवळपास एक आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त केला होता. कारण तो बर्याच महिन्यांनंतर आपली पत्नी डॅनी विलिसला भेटणारा होता. मात्र, आता तो कोरोना व्हायरसच्या कठोर नियमावलीच्या कारणामुळे भेटू शकणार नाही. तो आपल्या कुटुंबाला ऑगस्टमध्ये शेवटचा भेटला होता.
इंस्टाग्रामवर शेअर केली होती पोस्ट
स्टीव्ह स्मिथने इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले होते, “114 दिवस उलटून गेले, आता फक्त 7 दिवस बाकी आहेत. साडेचार महिने मी आपल्या पत्नीपासून दूर आहे. मी वाट पाहू शकत नाही. कारण माझी पत्नी मला ख्रिसमसच्या प्रसंगी भेटणार आहे.”
https://www.instagram.com/p/CI2P1KZpy4d/?utm_source=ig_web_copy_link
सिडनी आणि ऍडलेड मध्ये झाली नाही भेट
स्टीव्ह स्मिथला आपल्या पत्नीला भेटण्यासाठी अजून थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. व्हिक्टोरिया राज्याने आपल्या सीमा कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे बंद केल्या आहेत. परंतु यापूर्वी डॅनी आपल्या पतीला भेटण्याचा प्रयत्न करताना सिडनी आणि ऍडलेड येथे गेली होती. मात्र, भेट झाली नव्हती.
ख्रिसमस दिवशी करत आहेत सराव
स्टीव्ह स्मिथ आज आपल्या ऑस्ट्रेलियन संघसहकाऱ्यांसोबत ख्रिसमस साजरा करत आहे आणि त्याचबरोबर दुसर्या कसोटी सामन्याचा सरावही करत आहेत. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात 1 आणि नाबाद 1 धाव केली होती. स्मिथला आशा आहे की, मेलबर्न क्रिकेट मैदानावर त्याची खेळी चांगली होईल.
…म्हणून झाली नाही भेट
स्टीव्ह स्मिथ लॉकडाऊनच्या अगोदर इंग्लंड दौर्यावर गेला होता. त्यानंतर तिथूनच तो आयपीएलसाठी यूएईत गेला होता. तो आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्यानंतर तो भारताविरुद्ध मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आला. या कारणांमुळे स्टीव्ह स्मिथ आपल्या पत्नीला भेटू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“तो काहीही करू शकतो”, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याआधीच पंतचा ऑसी कर्णधाराने घेतला धसका
‘विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे सोन्यासारखी संधी’
केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादमधून होणार बाहेर? वॉर्नरने दिले ‘हे’ उत्तर