वनडे क्रिकेटमध्ये रविवारी (24 सप्टेंबर) सूर्यकुमार यादव याने चौथे अर्धशतक ठोकले. या फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार अद्याप अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली. अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक करणाऱ्या सूर्युकमारने या सामन्यात सलग चार षटकार मारले.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन (Cameron Green) या सामन्यात आपल्या संघासाटी चांगलाच महागात पडला. ईशान किशन याच्या रुपात भारताने आपली चौथी विकेट गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खेळपट्टीवर आला. सूर्यकुमाने अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रामक फलंदाजीला सुरुवात केली. 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने त्याने 24 चेंडूत अर्धशतक केले. यादरम्यान 44 व्या षटकात सूर्याने कॅमरून ग्रीन याला सलग चार षटकार मारले. षटकातील पहिल्या चार चेंडूत चार षटकार मारल्यानंतर सूर्यकुमार आणि केएल राहुल यांनी शेवटच्या दोन चेंडूंमध्ये प्रत्येकी एक-एक धाव घेतली. या षटकात भारतीय संघाला 26 धावा मिळाल्या. सूर्यकुमारच्या या चार षटकारांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
6⃣6⃣6⃣6⃣
The crowd here in Indore has been treated with Signature SKY brilliance! ????????#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank | @surya_14kumar pic.twitter.com/EpjsXzYrZN
— BCCI (@BCCI) September 24, 2023
भारतीय संघाने या सामन्यात 50 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 399 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी निर्धारीत 50 षटकांमध्ये 400 धावांचे लक्ष्य मिळाले. सूर्यकुमाने नाबाद 72 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. (IND vs AUS Suryakumar Yadav hit four consecutive sixes in Cameron Green’s over)
दुसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्यूशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन
महत्वाच्या बातम्या –
2023 गिलसाठी ठरलं खास, बनला ‘ही’ मोठी कामगिरी करणारा सातवा भारतीय, सचिनने केली होती सुरुवात
शुबमनची बॅट तळपली! अवघ्या 9 दिवसात झळकावलं दुसरं झंझावाती शतक