सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडिया बॅकफूटवर आहे. पहिल्या डावात 4 धावांची किंचित आघाडी मिळविल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 141 धावांत 6 विकेट गमावल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर रवींद्र जडेजा 39 चेंडूत एका चौकारासह 08 धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर 17 चेंडूत 06 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 4 बळी घेतले. भारताकडून रिषभ पंतने तुफानी फलंदाजी केली. पंतने 33 चेंडूत 61 धावांची खेळी खेळली.
दुसऱ्या डावात भारताची सुरुवात चांगली झाली होती. 42 धावांच्या सलामीची भागीदारी झाल्यानंतर स्कॉट बोलँडने केएल राहुलला बोल्ड केले. तो 20 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 13 धावांवर बाद झाला. यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल 22 धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहली 06 तर शुबमन गिल 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.
एकेकाळी भारताने 78 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर रिषभ पंतने पलटवार केला. त्याने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. पंतने 33 चेंडूत 61 धावांची खेळी खेळली. ज्यात त्याने 6 चौकार आणि 4 षटकार हणले. दुसऱ्या डावातही नितीशकुमार रेड्डीची बॅट चालली नाही. त्याला केवळ चार धावा करता आल्या. आता रवींद्र जडेजा 39 चेंडूत 1 चौकारासह 08 धावा आणि वॉशिंग्टन सुंदर 17 चेंडूत 06 धावा करून नाबाद आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत स्कॉट बोलंडने 42 धावांत 4 बळी घेतले आहेत. पॅट कमिन्स आणि ब्यू वेबस्टरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. मिचेल स्टार्क मात्र महागडा ठरला आहे. त्याने चार षटकांत 36 धावा दिल्या आहेत.
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 181 धावांत गडगडला. अशाप्रकारे भारताने 4 धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरने 57 धावांची सर्वाधिक मोठी खेळी खेळली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळणारा प्रसिध कृष्णा प्रभावित केले. त्याने 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
हेही वाचा-
कसोटीत टी20 खेळी..! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पंतनं धो धो धुतलं, रचला ‘विराट’ विक्रम
ॲंकरने ‘थँक्यू रोहित’ म्हटल्यावर हिटमॅनने दिले मुंबई स्टाईल उत्तर, ‘अरे भाई…’
‘ओये काॅन्ट्स…शॉट्स दिसत…’, जयस्वालने केली ऑस्ट्रेलियन सलामीवीराची थट्टा..!