ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि विजय देखील मिळवला. दुसऱ्या टी-20 सामन्यातील विजयानंतर मालिकेत भारतीय संघाने 1-1 अशी बरोबरी देखील केली आहे. कर्णधार रोहित शर्मा याने विजयासाठी मोलाचे योगदान दिले. पण शेवटच्या षटकात चौकार आणि षटकार मारल्यानंतर दिनेश कार्तिकवर देखील कौतुकाचा वर्षाव झाला. असे असले तरी, कार्तिकने विजयाचे सर्व श्रेय रोहितलाच दिले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा टी-20 सामना नागपुरमध्ये पार पडला. जोरदार पावसामुळे सामना वेळेत सुरू होऊ शकला नाही. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी आठ-आठ षटके खेळण्याची संधी दिली गेली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी घेतली, पण ऑस्ट्रेलियन संघाने जे करायचे ते केलेचं. आठ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावून 90 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनी महत्वाच्या धावा केल्या. भारताला विजय मिळवून देण्यासाठी या दोघांचे योगदान सर्वात महत्वाचे होते. रोहितने अवघ्या 20 चेंडूत 46 धावा कुटल्या, तर कार्तिकने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा केल्या.
सामना संपल्यानंतर या दोघांचे कौतुक होत होते. पण अनेकांच्या मते कार्तिकचे योगदान रोहितपेक्षाही जास्त होते. याच पार्श्वभूमीवर त्याला प्रश्न विचारला गेला. याचे उत्तर देताना कार्तिक म्हणाला की, “मी याचे श्रेय घेत नाहीये. रोहित शर्माने कमाल फलंदाजी केली. मला तर फक्त शेवटचे दोन चेंडू खेळायला मिळाले, ज्यावर मी प्रयत्न केल. रोहित शर्मा जबरदस्त फलंदाज केली. चेंडू नवीन असताना ऑस्ट्रेलियाच्या विश्वस्तरीय गोलंदाजांपुढे असे शॉट्स खेळणे खरोखर कौतुकास पात्र आहे. यातून समजते रोहित शर्मा किती मोठा खेळाडू आहे. त्याच्याकडे वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळण्याची चांगली क्षमता आहे.”
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेले 91 धावांचे लक्ष्य भारताने चार चेंडू शिल्लक ठेवून केला. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजांमध्ये अक्षर पटेलने 2 तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियासाठी यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. तर त्यांचा फिरकी गोलंदाज एडम झंपाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता अर्जुन तेंडुलकरचे प्रदर्शन सुधारणार! सचिनने ‘या’ कडक प्रशिक्षकांच्या हवाली केला मुलगा
एमएसएलटीए बी1आशियाई कुमार टेनिस स्पर्धेत एकेरीत मानस धामणे व श्रुती अहलावत यांना विजेतेपद
विराटच्या एका इशाऱ्यावर नागपूर स्टेडियम ‘गप-गार’, चाहत्यांच्या ‘या’ कृत्यामुळे भडकला माजी कर्णधार