भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील येत्या १७ डिसेंबरपासून सुरू होणारी ४ सामन्यांची कसोटी मालिका दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतीय गोलंदाजांपुढे सर्वात मोठे आव्हान असेल ते म्हणजे स्टीव्ह स्मिथ या फलंदाजाचे. स्मिथने भारताविरुद्ध खेळलेल्या १० कसोटी सामन्यांत तब्बल ७ शतकांसह १४२९ धावा केल्या आहेत. स्मिथला बाद करण्याचे तोड अजूनही जगातील कोणत्याच गोलंदाजाला भेटले नाहीये. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज गोलंदाज ब्रॅड हॉग यांनी स्मिथला कसे बाद करावे, याचा उपाय सांगितला आहे.
ब्रॅड हॉग यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले, “स्मिथला गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याऐवजी स्टंपवर टाकावा. गुलाबी चेंडू हवेत थोडा जास्त स्विंग होतो व अशा परिस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजांनी स्टंपवर गोलंदाजी केली, तर ते स्मिथला पायचीत करू शकता.”
ब्रॅड हॉग यांच्या मते, अश्विन आपल्या गोलंदाजीने स्मिथला बाद करू शकतो. अश्विनने आपल्या उंचीचा फायदा घेऊन योग्य गोलंदाजी केल्यास स्मिथला बाद करण्यात तो यशस्वी होऊ शकतो.
सन २०१४-१५ मधील बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत स्मिथने ४ सामन्यात १२८.१७ च्या सरासरीने ७६९ धावा केल्या होत्या. यामध्ये ४ शतकांचाही समावेश होता. यानंतर मात्र डेविड वॉर्नर आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट यांच्यासह त्याच्यावर चेंडू छेडछाड प्रकरणामुळे १ वर्षांची बंदी घातली होती.
स्मिथने नुकतेच भारताविरुद्ध खेळलेल्या वनडे मालिकेत दमदार २ शतके ठोकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडची वेस्ट इंडिजवर मात, टेस्ट रँकिंगमध्ये पटकावला ‘हा’ क्रमांक
“इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा”
मैदानात पुन्हा येणार ‘हिटमॅन’चं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर कुलदीप यादव
अरेरे! कांगारूविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘या’ चार भारतीय खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी