ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दुसऱ्या डावातील 163 धावांच्या जोरावर भारतीय संघ कसाबसा 75 धावांची आघाडी घेऊ शकला. संघातील इतर फलंदाज स्वस्तात बाद झाले असले, तरी चेतेश्वर पुजारा याने मात्र स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. या खेळीनंतर पुजारा एका खास यादीत सचिन तेंडुलकर नंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) भारतीय संघासाठी सर्वाधिक वेळा ‘टॉप स्कोरर’ राहिला आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 20 कसोटी सामन्यांमध्ये संघातील इतरांपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता या यादीत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने विराट कोहली (Virat Kohli) याला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. गुरुवारी पुजारा भारतासाठी 13व्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांचे योगदान देऊ शकला. विराट कोहली 12 वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावांचे योगदान देऊ शकला असून यादीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध (कसोटी) सर्वाधिक वेळा ‘टॉप स्कोरर’ राहिलेले भारतीय फलंदाज
20 वेळा – सचिन तेंडुलकर
13 वेळा – चेतेश्वर पुजारा
12 वेळा – विराट कोहली
दरम्यान, उभय संघांतील हा सामना बुधवारी (1 मार्च) रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये सुरू झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मधील हा तिसरा सामना असून पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात मात्र विजय ऑस्ट्रेलिया संघासाठी सोपा दिसत आहे. पहिल्या डावात भारत अवघ्या 109 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 197 धावा केल्या आणि 88 धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या दुसर्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारतीय संघ दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आला आणि 163 धावांवर सर्वबाद देखील झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ अवघ्या 75 धावांनी आघाडीवर आहे. भारतीय संघासाठी या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये एकटा चेतेश्वर पुजाराच अर्धशतक करू शकला. (IND vs AUS Test Series Most Top Scores for India against Australia in Tests)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हमधील ‘या’ पठ्ठ्याला सोडून लायनने सर्वांची केलीय शिकार, यादी पाहाच
इंदोर कसोटीवर ऑस्ट्रेलियाची घट्ट पकड! भारतीय फलंदाजी पुन्हा फेल, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य