भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन येथे खेळवला जाणारा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. आज म्हणजेच बुधवार 18 डिसेंबरला सामन्याचा शेवटचा दिवस होता. पाचव्या दिवशी रोमांचक खेळाची अपेक्षा होती. पण पावसाने खेळात व्यत्यय आणला आणि सामना अनिर्णित राहिला.
भारतासमोर विजयासाठी 54 षटकांत 275 धावांचे लक्ष्य होते. ज्यात भारताने 2 षटकांत 8 धावा केल्या होत्या. यानंतर पुढे सामना सुरू होऊ शकला नाही. या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 260 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 89 धावांवर डाव घोषित केला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला केवळ 2 षटकेच खेळता आल्या. यानंतर खराब हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला आणि शेवटी सामना ड्राॅ राहिला.
पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 185 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा धक्का दिला. उस्मान ख्वाजा 8 तर मार्नस लॅबुशेन केवळ 1 धावा करून बाद झाला. बुमराहनंतर आकाशदीपनेही कांगारू फलंदाजांना त्रास दिला. त्याने नॅथन मॅकस्विनी आणि मिचेल मार्शला तंबूत पाठवले. काही वेळाने मोहम्मद सिराजनेही वाहत्या गंगेत आपले हात धुऊन घेतले कारण त्याने प्रथम स्टीव्ह स्मिथ आणि नंतर ट्रॅव्हिस हेडला 17 धावांवर बाद केले.
पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया 1-1 ने बरोबरीत आहेत. आता पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे दोन्ही संघांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये प्रत्येकी 4 गुण मिळाले आहेत. आता अश्या परिस्थितीत अंतिम शर्यत आणखीनच रोमांचक झाली आहे.
हेही वाचा-
पर्थनंतर ब्रिस्बेनमध्येही ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर कोसळली, 20 वर्षांत दुसऱ्यांदा असं घडलं
IND vs AUS; ‘गाबाचा घमंड’ पुन्हा मोडून काढण्यासाठी टीम इंडिया समोर 275 धावांचे लक्ष्य!
कसोटीच्या चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या (टाॅप-5) संघ