ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघ भारताच्या (INDvsAUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पहिल्या टी20 सामन्यात यजमानांना दारूण पराभव पत्कारावा लागला. मोहाली, पंजाब येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची चांंगलीच धुलाई केली. तर दौऱ्यातील दुसरा सामना नागपूर येथे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजीत बदल दिसण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळणार आहे. तो दुखापतीमुळे काही दिवस संघाबाहेर होता. त्याने भारताकडून शेवटचा सामना 14 जुलैला खेळला आहे. यादरम्यान भारताने अनेक मालिका खेळल्या आहेत. मात्र त्याची कमतरता आशिया चषक 2022मध्ये सर्वाधिक जाणवली. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही भारताला 208 धावसंख्येचा बचाव करता आला नाही. यामुळे बुमराह संघात असणे अत्यावश्यक आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने बुमराह दुसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचे सांगितले आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले, संघ व्यवस्थापकांना वाटले की, “बुमराहने संघात येताच त्याच्यावर दबाव निर्माण होऊ नये. यामुळे त्याला पहिल्या टी20 सामन्यात खेळवले नाही. तो सध्या पूर्ण क्षमतेनुसार गोलंदाजीचा सराव करत आहे आणि तो सामना खेळण्यासाठी तयार आहे.”
Jasprit Bumrah set to be included in the playing X1 in the 2nd T20. (Source – Cricbuzz)
— Johns. (@CricCrazyJohns) September 22, 2022
तसेच बुमराहने भारताकडून खेळलेल्या शेवटच्या टी20 सामन्यात इंग्लंड विरुद्ध 3 षटके टाकली होती. त्यामध्ये त्याने 10 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक टी20 विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. त्याने 11 डावात 15 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या षटकात केलेली गोलंदाजी महागात पडली. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड याने 21 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 षटकात 6 विकेट्स गमावत 208 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ताबडतोब फलंदाजीला सुरूवात केली. एकीकडे त्यांच्या विकेट्स पडल्या असल्या तरी त्यांच्या फलंदाजांनी मोठे शॉट्स खेळण्याचे थांबवले नाही. यामुळे त्यांनी 19.2 षटकातच लक्ष्य पार केले. यावेळी भारताच्या केवळ अक्षर पटेल याने उत्तम गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर बाकी गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन हरमनप्रीतने केली इंग्लंडची धुलाई! सलग 11 चेंडूत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत कुटल्या ‘इतक्या’ धावा
‘मी सलामीवीर आहे आणि फिनशरही!’, टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर सॅमसनची मोठी प्रतिक्रिया
फुटबॉलचा बादशाह रोनाल्डो ‘या’ दिवशी होणार निवृत्त; स्वतः दिली माहिती