भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीतील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरूवात झाली आहे. पहिली कसोटी पर्थमध्ये खेळली गेली, ज्यामध्ये भारताने जबरदस्त विजय नोंदवला होता. तर आता दुसरा कसोटी सामना भारतीय संघाला गुलाबी चेंडूने खेळायचा आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियात हा दुसरा गुलाबी चेंडूचा सामना आहे. जो की 6 डिसेंबर रोजी ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जाईल.
भारताने अजून बरेच डे-नाईट कसोटी सामने खेळलेले नाहीत. गुलाबी चेंडूचे सामने मायदेशात घेण्यास बीसीसीआय फारसे उत्सुक नाही. या कारणास्तव टीम इंडियाने आतापर्यंत फक्त 4 गुलाबी बॉल टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत आणि त्यापैकी तीन जिंकल्या आहेत. तर एका सामन्यात पराभवही झाला आहे. तर या बातमीद्वारे आम्ही त्या 3 भारतीय गोलंदाजांबद्दल बोलणार आहेत, ज्यांनी पिंक बॉल टेस्टमध्ये
सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
3. उमेश यादव
या यादीत भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज उमेश यादवचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. उमेशने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त दोनच गुलाबी चेंडूच्या कसोटी खेळल्या आहेत. ज्यात त्याने 11 बळी घेतले आहेत. एका डावात त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 5/53 आहे. उमेश बराच काळ संघाबाहेर असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याची निवड झालेली नाही.
2. अक्षर पटेल
डावखुरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला सध्या गेल्या काही कसोटींमध्ये संधी दिली जात नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याची संघात निवड झालेली नाही. त्याने पिंक बॉल कसोटीत दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले असून, ज्यात त्याने 9.14 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत.
1. रविचंद्रन अश्विन
अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. असे असूनही त्याला ॲडलेड कसोटीत स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. अश्विनच्या नावावर दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या 4 सामन्यात 18 विकेट्स आहेत. या दरम्यान 4/48 ही त्याची डावातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
हेही वाचा-
गुलाबी चेंडूच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
IND VS AUS; “परदेशी भूमीवर ही टीम इंडियाची…”, पर्थ विजयाबाबत रिकी पाँटिंगचे मोठे विधान
पाकिस्तानला धक्का! इंग्लंड क्रिकेटपटूंचा पीएसलमध्ये सहभाग घेण्यास नकार; मोठे कारण समोर