---Advertisement---

“गावसकर यांच्या मताने आम्हाला तसूभरही फरक पडत नाही”, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे विधान

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी सिडनीत पार पडला. हा सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला. त्यामुळे भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. मात्र या तिसर्‍या सामन्यात जे टीम पेनने जे वर्तन केले होते, त्यावर सुनिल गावसकर यांनी उघडपणे टीका केली होती. यावर आता टीम पेनने प्रतिक्रिया दिली आहे.

गावसकर यांनी केलेल्या टीकेवर टीम पेन म्हणाला, “सुनील गावसकर यांना आपले मत मांडण्याचा हक्क आहे. मात्र त्यांच्या कोणत्याही मताचा ऑस्ट्रेलियन संघावर कसलाही परिणाम होणार नाही.” भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर सुनील गावसकर यांनी उघडपणे टीम पेनवर टीका केली होती. त्याचबरोबर ते म्हणाले होते, ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार म्हणून टीम पेनकडे बोटांवर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले आहेत.

आभासी पत्रकार परिषदेत बोलताना टीम पेन म्हणाला, “मी यामध्ये सहभागी होत नाही. सुनील गावसकर सोबत पुढे आणि मागे जाण्याचा काही अर्थ नाही. मला वाटत नाही, मी त्यामध्ये जिंकेल. त्यांना मत मांडण्याचा हक्क आहे. याचा आमच्यावर थोडा सुद्धा परिणाम होणार नाही. कारण हे कसोटी क्रिकेटला धरून काही सुद्धा नाही. सनी बोलू शकतात, त्यांना जे बोलायचे ते, परंतु शेवटी आम्हाल या बाबीबद्दल काही घेणे देणे नाही.”

टीम पेनने तिसर्‍या कसोटी सामन्यात यष्टीमागे जे वर्तन केले होते, त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याला पंचासोबत वाद घालणे आणि डीआरएस निर्णयावरून तक्रार केल्यामुळे त्याच्यावर दंड आकारण्यात आला होता. त्याचबरोबर तिसर्‍या कसोटीतील शेवटच्या दिवशी त्याची अश्विन सोबत शाब्दिक चकमक घडली होती. तसेच या सामन्यात त्याने तीन झेल सोडले होते आणि हा सामना अनिर्णीत राहिला.

टीम पेन म्हणाला, “मला वाटते या प्रकरणाला मी वेगळ्या प्रकारे हाताळेल. मी या गोष्टीचा स्विकार केला आहे की, मी स्वतःवर लक्ष देईन आणि आपल्या संघाचे नेतृत्व करेल. खेळाने आपल्यावर नियंत्रण मिळण्यापेक्षा, आपल्याला खेळावर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. कदाचीत आम्ही असे करू शकलो तर खेळामध्ये वेगळी स्थिती निर्माण होईल. जर तुम्ही माझी कारकीर्द बघितली, तर निवांत राहण्यासाठी चांगले काम केले आहे. काही वेळा तुम्हाला वाटते की, आपण क्षणात फसतो.”

महत्वाच्या बातम्या:

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहला सगळे सामने खेळवण्याची गरज नाही

न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा, दुखापतीमुळे उपकर्णधार मालिकेला मुकणार

दोन दशकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा गाजतोय अझरुद्दीन; काय आहे नावामागील मनोरंजक रहस्य, वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---