भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबर पासून कसोटी मालिकेचा धुमाकूळ सुरू होणार आहे. दोन्ही संघाने या मालिकेसाठी आप आपली योजना आखल्या आहेत आणि मैदानात त्या राबविण्यात येतील. एका बाजूला भारतीय संघ स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल, तर दुसर्या बाजूला ऑस्ट्रेलिया संघ रनमशीन विराट कोहलीला रोखण्याचा प्रयत्न करतील.
विराट कोहलीची अॅडलेड मैदानावरील कामगिरी दमदार राहिली आहे. त्याने या मैदानावर तीन सामन्याच्या सहा डावात 3 शतके ठोकली आहेत. त्यामुळे या रनमशीनला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने योजना आखली आहे. ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनला आपल्या आखलेल्या योजनेवर पूर्ण भरोसा आहे. यामुळे त्याला विराट कोहलीची चिंता नाही. पेन म्हणाला, “जर मैदानावर काही गोष्टी बिघडल्या तर त्यांचा संघ मागे राहणार नाही.
टीम पेन म्हणाला, “प्रत्येकाकडे महान खेळाडूसाठी योजना असते, यासाठी ते सर्वश्रेष्ठ खेळाडू असतात. कारण की, काही गोष्टीबरोबर ते ताळमेळ बसवू शकतात. ते जे बदल करू शकतात तेच तुम्ही करत आहात आणि विराट त्यापैकी एक खेळाडू आहे. सर्वश्रेष्ठ नाही तर सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. एक वेळ अशी येते की जेव्हा कोणत्याच गोष्टी काम करत नाहीत आणि अपेक्षा आहे की, अशी एकच कसोटी असावी. परंतु आमच्याकडे त्याच्याविरुद्ध रणनिती आहे, जे त्याच्याविरुद्ध काम करेल. नाही तर आमच्याकडे अजून काही योजना आहेत.”
टीम पेन म्हणाला, “आमचे गोलंदाजीचे आक्रमण विराटला त्रास देण्यासाठी खुप आहेत. आमच्या गोलंदाजीच्या आक्रमणाचे चांगली गोष्ट ही आहे की, हे सर्व वेगळ्या प्रकारचे गोलंदाज आहेत. आमच्याकडे नॅथन लियॉन आहे आणि कैमरुन ग्रीनसुद्धा. आमच्याजवळ एक वेगळा कोन, वेगळ्या गतीसाठी मार्नस लाबुशैन आहे. आमच्याकडे खुप सगळे पर्याय आहेत.” पेनचे म्हणणे आहे की, मिचेल स्टार्कच्या पुनरागमनामुळे संघ अजून मजबूत झाला आहे. कारण त्याची गुलाबी चेंडूने कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने सात दिवस – रात्र कसोटी सामन्यात 42 बळी घेतले आहेत. पेन म्हणाला, “तो अधिक आक्रमक होणार नाही. परंतु गरज पडली तर तो उत्तर देण्यासाठी मागे हटणार नाही”
विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे आणि भारतीय संघाची कमान अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. त्यामुळे पेन म्हणाला, “आम्ही उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण तो संघातीला एकजुट राखू शकतो. ”
पेन म्हणाला, “जेव्हा कोहली जाईल, आम्हाला माहित त्याच्याजवळ किती प्रतिभा आहे. चेतेश्वर पुजाराने मागील वेळेस आम्हाला खुप सतवले होते. त्यामुळे त्याची विकेट आमच्यासाठी महत्वाची असणारा आहे, परंतू आम्ही त्यांच्या संघातील गुणवत्ता जाणतो. रिषभ पंतने मागील आठवड्यात चांगले प्रदर्शन केले होते आणि शतकसुद्धा झळकवले होते. यामुळे त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत जे कसोटी सामना हिरावून घेवू शकतात. अजिंक्य संघाला एकजुट ठेवतो. मागील मालिकेत त्याने ते काम केले होते. त्यामुळे त्याच्यावर आमचे लक्ष असणार आहे.”
संबधित बातम्या:
– बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– मैदानात पुन्हा येणार हिटमॅनचं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना






