आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 सुरू होण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी आहे. पण विराट कोहलीचा खराब फॉर्म संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कर्णधार रोहित शर्मा वगळता टीम इंडियाचे सर्व खेळाडू 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने सेंटर विकेट सराव केला. ज्यामध्ये विराट कोहली बॅटने काही खास करू शकला नाही. कोहली केवळ 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने कोहलीला आपला बळी बनवले.
सेंटर विकेट सराव दरम्यान विराट कोहलीने 15 धावा केल्या. ज्यात मुकेश कुमारच्या एका चेंडूवर शानदार कव्हर ड्राईव्हचा समावेश होता. परंतु काही चेंडूंनंतर तो चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ढकलण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या स्लिपमध्ये झेलबाद झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतरही कोहलीचा फ्लॉप शो सुरूच आहे. कोहलीने भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या 2 मालिकेतही अत्यंत खराब कामगिरी केली होती. बांग्लादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोहलीला 100 धावाही करता आल्या नाहीत. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत कोहलीची कामगिरी आणखीनच वाईट होती. कोहलीला 6 डावात केवळ 93 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत आता कोहलीवर ऑस्ट्रेलियात स्वत:ला सिद्ध करण्याचे दडपण असेल.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी, टीम इंडिया ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारत अ विरुद्ध इंट्रा स्क्वॉड सामना खेळणार होती. पण ती रद्द करण्यात आली. यानंतर भारतीय संघाने पर्थमधील सेंटर विकेटवर सराव करण्याचा निर्णय घेतला. या सरावादरम्यान केवळ कोहलीच नाही तर सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही निराश केले. जयस्वालही 15 धावा करून बाद झाला. जयस्वालची अलीकडची कामगिरीही काही विशेष झाली नाही. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचे त्याच्यावर खूप दडपण असेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) ), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
हेही वाचा-
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील ऑलटाइम प्लेइंग 11, वीरेंद्र सेहवागसह या दिग्गज खेळाडूंचा समावेश
IND VS SA; चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडिया बदल करणार? या खेळाडूबाबत प्रश्नचिन्ह
‘किंग आता त्या ठिकाणी आला आहे जिथे… ‘, विराट कोहलीबाबत रवी शास्त्रींचा अंदाज