---Advertisement---

IND VS AUS; थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ! केएल राहुल बाद की नाबाद? तुम्हीच सांगा, पाहा VIDEO

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या कसोटी सामन्यात कोणत्याही मुद्द्यावरून वाद होत नसल्याचे क्वचितच पाहायला मिळते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात केएल राहुलला ज्या पद्धतीने बाद करण्यात आले, त्यावरून वाद सुरू झाला आहे. थर्ड अंपायरने केएलला ज्या पद्धतीने आऊट केले त्याबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड संताप आहे.

एकीकडे भारतीय संघ एकापाठोपाठ एक विकेट गमावत असताना केएल राहुलने एक टोक सांभाळले होते. या सामन्यात केएलने यशस्वी जयस्वालसह डावाची सुरुवात केली. यशस्वी आणि देवदत्त पडिक्कल खाते न उघडताच बाद झाले. तर विराट कोहली अवघ्या पाच धावा करून बाद झाला. भारताने केवळ 32 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या धोकादायक गोलंदाजीसमोर केएल राहुलचा शानदार बचाव दिसला. लंच ब्रेकच्या काही वेळापूर्वी केएल राहुल मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.

केएलने 74 चेंडूत 26 धावा केल्या. 22.2 षटकांत ॲलेक्स कॅरीने स्टार्कच्या चेंडूवर झेलबाद करण्याचे जोरदार अपील केले. ऑनफिल्ड अंपायरने राहुलला नाबाद घोषित केले, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. स्नीकोमीटरवर एक स्पाइक दिसला, परंतु चेंडू बॅटला स्पर्श झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे कुठेही स्पष्ट झाले नाही. तर, थर्ड अंपायरने ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय बदलला आणि केएलला आऊट घोषित केले. केएलच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. ही विकेट ऑस्ट्रेलियासाठीही खूप मोठी विकेट होती. पर्थमध्ये भारतीय संघ या बातमीपर्यंत 74/6 अश्या स्थितीत आहे.

हेही वाचा-

ठरलं..! आयपीएल 2025 या दिवशी सुरू होणार, पुढील तीन वर्षांचे वेळापत्रक समोर
IND VS AUS; टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत 51/4
अश्विन-जडेजाशिवाय भारत शेवटचा कधी खेळला? गेल्या 10 वर्षात 5व्यांदा असं घडलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---