भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताचा 51 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. भारतीय संघाचा या मालिकेतील हा सलग दुसरा पराभव होता. या पराभवासह तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने गमावली आहे.
भारतीय संघाने हे दोन्ही सामने स्टार फलंदाज रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांना रोहित शर्माची कमतरता जाणवली. एवढेच नव्हे,तर दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने 370 धावांचा टप्पा पार केल्याने चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी विराट ऐवजी रोहितला कर्णधारपद सोपवण्याबद्दल सल्ला दिला आहे.
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात झालेल्या पराभवानंतर चाहत्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या लेखात आपण त्यापैकीच काही प्रतिक्रिया पाहणार आहोत.
With Rohit Sharma physically in India and Virat Kohli mentally here, how about calling back the Indian team to join Rohit Sharma and prepare for the next IPL? 🤔🤔🤔
— . (@swarup58) November 29, 2020
@imVkohli 7 over 70 runs U select saini on the basis of ? Rcb teammate i guess😂
Rohit sharma for the capitancy all the way❤ #AUSvIND— Sau'rabh Chavan☦ DC (@junior_chavan) November 29, 2020
Time for @ImRo45 to taker over the capitancy from @imVkohli ?#AUSvIND
— Teja Sai (@TejaSai82052010) November 29, 2020
Captaincy matters… Big opener missing…. Virat kohli has been struggling with his captaincy. His own performance is not helping him either. His planning and strategies are not working out well. We really need #rohit Sharma back. 💙💙 #AUSvsIND #RohithSharma pic.twitter.com/U51qOYdHKM
— Jyoti Suman (@Jas23478675) November 29, 2020
https://twitter.com/MonuSin95877888/status/1333324960287260673
@imVkohli as a batsman is great bt virat as a captain not as good as @ImRo45. like sachin he is a great batsman bt not a captain so he left his captainsy during his time
— MUSTAFA (@MustafaMshaikh) November 30, 2020
It's a good time to give Indian cricket team under @ImRo45 Captaincy. It will be good.We r not able to see losing streak continuously under Virat.He can't able to know how to handle pressure situation with bumrah and shami.Rohit knows it will.Pls Pls Viraf step-down.#RohitSharma pic.twitter.com/jvTsVkUZN1
— Nithish Sharma✨ (@NithishRo45) November 30, 2020
वास्तविक दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेचा भाग नाही. कसोटी मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यातून तो भारतीय संघात पुनरागमन करेल अशी चर्चा आहे. तो सध्या बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडेमीमध्ये तंदुरुस्तीवर काम करत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दोन वनडे पराभवानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे सलग सात पराभव झाले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा वनडे सामना बुधवारी ( 2 डिसेंबर ) खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
Video : लई भारी ! ऑस्ट्रेलियात घुमला छत्रपती शिवरायांचा जयघोष, तिरंग्यासोबत भगवाही झळकला
पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजी पुन्हा ‘विकेटलेस’, सलग पाचव्यांदा दिल्या खोर्याने धावा