---Advertisement---

भारतीय कसोटी इतिहासात घडणार मोठा चमत्कार, जयस्वाल मोडणार सर्वात मोठा विक्रम

---Advertisement---

ज्या क्षणाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आहे. उद्यापासून म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील या पहिल्या सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय फलंदाजांवर असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या संघाला पहिल्या कसोटी सामन्यात खेळणे कठीण आहे कारण तो सध्या आपल्या कुटुंबासह भारतात आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलला सलामीला मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केएल राहुलचा अलीकडचा फॉर्म काही विशेष राहिला नाही. त्यामुळे भारतीय संघाला चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या खांद्यावर असेल.

जयस्वालचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. ज्यात संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. युवा डावखुऱ्या सलामीवीरासाठी 2024 हे वर्ष आत्तापर्यंत चांगले गेले आहे. जो रूटनंतर तो या वर्षात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने 11 कसोटी सामन्यांच्या 21 डावांमध्ये 1119 धावा केल्या आहेत. ज्यात 2 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 55.95 राहिली आहे.

जयस्वालचा उत्कृष्ट फॉर्म लक्षात घेता पर्थ कसोटीच्या पहिल्या डावातच मोठा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. खरे तर, पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 15 धावा करून यशस्वी जयस्वाल इतिहास रचणार आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा तो डावखुरा भारतीय फलंदाज बनेल. सध्या हा विक्रम भारताचा माजी सलामीवीर आणि टीम इंडियाचा विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नावावर आहे. गंभीरने 2008 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 1134 धावा केल्या होत्या.

या मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत. यादरम्यान जयस्वालला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याचीही संधी असेल. जर तो 444 धावा करण्यात यशस्वी झाला तर तो एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 1562 धावा केल्या होत्या.

हेही वाचा-

“थोडेसे ज्ञान तुमच्या भविष्यसाठी…”, संजय मांजरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोहम्मद शमीची तिखट प्रतिक्रिया
IND VS AUS; ऑस्ट्रेलियात भारताविरुद्ध कांगारुंचा दबदबा, असा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---