भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर रोजी ऍडिलेड येथे खेळला जाईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ या दोन संघात शुक्रवारी (11 डिसेंबर) सराव सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा खेळत नसल्यामुळे संघाची सुरुवात अत्यंत दयनीय झाली.
विराटच्या अनुपस्थितीत खेळला जातोय सराव सामना
हा सराव सामना गुलाबी चेंडूने खेळला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत हा सामना खेळला जातोय. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे करतोय.
भारताची सुरुवात खराब
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि रहाणेने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर मयंक अगरवाल अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. मात्र, त्याचा सहकारी सलामीवीर पृथ्वी शॉ याने जबरदस्त खेळी केली. परंतु त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. 40 धावा करून तो तंबूत परतला.
शुबमन गिल 43 धावा करून परतला तंबूत
अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाऱ्याच्या अनुपस्थितीत शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला. त्याने खेळपट्टीवर टिकून फलंदाजी केली, परंतु त्यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो 43 धावा करून तंबूत परतला.
बुमराहने केल्या 55 धावा
गिल बाद झाल्यावर नियमित अंतराने गडी बाद होत राहिले. कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. भारताची 9 बाद 123 अशी दयनीय अवस्था होती. त्यानंतर बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनीही दहाव्या विकेटसाठी 71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामध्ये बुमराहने 55 धावांची जबरदस्त खेळी केली. सिराज 23 धावांवर झेलबाद होताच भारताचा डाव 194 धावांवर संपुष्टात आला.
बुमराहने ऑस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का
प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकांत या संघाला पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहने डावाच्या दुसऱ्याच षटकांत सलामीवीर जो बर्न्स याला झेलबाद केले. बर्न्सला भोपळाही फोडता आला नाही. 13.3 षटकाखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 48 अशी होती.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’