टीम इंडियाने बुधवारी दिल्लीत बांग्लादेशविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळला. ज्यामध्ये, नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्यातील शतकी भागीदारीमुळे बांगलादेशचा 86 धावांनी पराभव झाला. आता भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशचा दारुण पराभव झाला. कारण भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेतल्या, सर्व सात गोलंदाजांनी किमान एक विकेट घेतली आणि हार्दिक पांड्याने तीन झेल घेतले.
टीम इंडियासाठी रिंकू सिंगने शानदार फलंदाजी केली. एकेकाळी पाॅवरप्लेमध्ये 3 विकेट्स गमवल्याने भारतीय संघ गोत्यात आला होता पण त्यानंतर रिंकू आणि नितीश रेड्डी यांनी संघाला सावरले. रिंकूने 53 धावांची वादळी खेळी खेळली. त्याने टी20 मधील त्याचे तिसरे अर्धशतक झळकावले. सामन्यानंतर बोलताना रिंकू सिंग म्हणाला, “मी स्वतःला कठीण परिस्थितीत शांत राहण्यास सांगत असतो. माझ्यासाठी हे साहजिक आहे. कारण मी या क्रमांकावर बराच काळ फलंदाजी करत आहे. त्यानुसार मी सरावही करतो. मी माही भाईशी (एमएस धोनी) याबद्दल खूप बोललो आहे. ज्याने मला मदत केली आहे. जेव्हा तुम्ही 3-4 विकेट गमावता तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास हवा असतो. नितीश कुमारसोबतच्या भागीदारीबाबत रिंकूने सांगितले की, आम्हाला फक्त भागीदारी करायची होती कारण विकेट थोडी संथ होती, आम्हाला स्ट्राईक रोटेट करून केवळ खराब चेंडू मारायचे होते. महमुदुल्लाहच्या फ्री-हिट चेंडूनंतर गती बदलली आणि नितीशला खूप आत्मविश्वास मिळाला.
रिंकू आणि नितीश रेड्डी यांच्या अर्धशतकाच्या आणि पंड्याने 19 चेंडूत आक्रमक 32 धावांच्या मदतीने भारताची एकूण धावसंख्या 221-9 पर्यंत पोहचली. बांग्लादेशकडून गोलंदाजीमध्ये तस्किन अहमद (2-16) सर्वात यशस्वी ठरला आणि शेवटच्या षटकात रिशाद हुसेनने तीन बळी घेतले.
सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाल्यानंतर टीम इंडिया 41-3 अश्या नाजूक स्थितीत होती. मात्र, रेड्डी आणि रिंकूने स्ट्राईक रोटेट करत 49 चेंडूत 108 धावांची भागीदारी केली. रेड्डीने 34 चेंडूत 4 चौकार आणि सात षटकारांसह 74 धावा केल्या. त्याने मेहदी हसन मिराझच्या एका षटकात 26 धावा ठोकल्या.
हेही वाचा-
भारताचा घरच्या मैदानावर सलग सातवा टी20 मालिका विजय, ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम धोक्यात
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची मोठी झेप; जाणून घ्या सेमीफायनलचे समीकरण
सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा डंका! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असा चमत्कार पहिल्यांदाच