भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. त्यातील दुसरा सामना काल म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकून भारताने टी20 मालिकाही जिंकली आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या स्वॅग शॉटने सर्वांना अचंबित केले होते. तर दुसऱ्या टी20 सामन्यात हार्दिकने सनसनाटी सीमारेषेवरील झेल घेऊन चर्चेत आला आहे. हार्दिकच्या या शानदार झेलचे सर्वजण कौतुक करत आहेत.
बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्याचा एक खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याने अप्रतिम झेल घेतला. तेव्हा ते पाहून प्रेक्षक चाहते मंत्रमुग्ध झाले. बांग्लादेशच्या डावाच्या 14व्या षटकात रिशाद हुसेनने वरुण चक्रवर्तीविरुद्ध उंच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला चेंडूशी योग्य संपर्क साधता आला नाही.
चेंडू दोन क्षेत्ररक्षकांमध्ये पडू लागला, पण हार्दिकने डीप मिडविकेटवरून धाव घेतली आणि सीमारेषेवर येताच त्याने उडी मारली आणि एका हाताने अप्रतिम झेल घेतला. हा झेल प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला आणि संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले.
पाहा व्हिडिओ..
Athleticism at its best! 😎
An outstanding running catch from Hardik Pandya 🔥🔥
Live – https://t.co/Otw9CpO67y#TeamIndia | #INDvBAN | @hardikpandya7 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ApgekVe4rB
— BCCI (@BCCI) October 9, 2024
नितीश रेड्डी यांनी बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेतून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्या सामन्यात तो 16 धावा करून नाबाद राहिला. दुस-या सामन्यात नितीशला चेंडूसोबतच बॅटनेही चमकदार खेळ दाखवण्यात यश आले. नितीश कुमार रेड्डीने दुसऱ्या टी20 सामन्यात 34 चेंडूत 217.65 च्या स्ट्राइक रेटने 74 धावा केल्या. ज्यामध्ये 4 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात नितीशने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 5.75 च्या इकॉनॉमीसह 2 बळी घेतले.
हेही वाचा-
PAK vs ENG; जो रूट मुलतानचा नवा सुलतान, पाकिस्तानविरुद्ध दणदणीत द्विशतकी खेळी
IND vs BAN: दमदार कामगिरीबाबत बोलताना रिंकू म्हणाला, “मी माही भाईकडून…”,
भारताचा घरच्या मैदानावर सलग सातवा टी20 मालिका विजय, ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम धोक्यात