बांगलादेश विरुद्ध भारत संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवट शनिवारी (दि. 10 डिसेंबर) होणार आहे. या मालिकेतील अखेरचा सामना चट्टोग्राम येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने यजमान बांगलादेश संघाने आपल्या नावावर केले आहेत. तसेच, मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतापुढे विजय मिळवण्याचे आव्हान असेल. पहिल्या दोन्ही सामन्यात बांगलादेश संघाने भारतावर वर्चस्व गाजवले आहे. विशेषत: फलंदाजीतील वरची फळी पूर्णत: अपयशी ठरली आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजांनीही निराश केले आहे.
गोलंदाजीत भारतीय संघ दबाव बनवताना दिसत नाहीये. याव्यतिरिक्त खेळाडूंच्या फिटनेसची चिंता भारताला सतावत आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुसऱ्या वनडेत दुखापतग्रस्त झाला होता. अशात म्हटले जात आहे की, शेवटच्या वनडेत प्लेईंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल होऊ शकतात. मात्र, त्यापूर्वी तिसऱ्या सामन्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया…
कधी, कुठे आणि कसे पाहू शकता तिसरा वनडे सामना?
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना केव्हा खेळला जाईल?
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना शनिवारी (दि. 10 डिसेंबर) खेळला जाईल.
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना कुठे खेळला जाईल?
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना जहुर अहमद चौधरी स्टेडिअम, चट्टोग्राम येथे खेळला जाईल.
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना किती वाजता सुरू होईल?
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. तसेच, नाणेफेक 11 वाजता होईल.
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहू शकता?
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कशावर होईल?
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ऍपवर होईल. (ind vs ban 3rd odi live streaming battle of credibility for team india know when where to watch read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा आमचा पर्सनल मॅटर…’, सानियासोबत घटस्फोटाच्या बातम्यांवर पाकिस्तानी क्रिकेटरने सोडले मौन
‘तुम्ही या विजयाचे खरे हक्कदार आमदार जी’, पत्नीच्या विजयावर जडेजाकडून स्तुतीसुमने; पाहा ट्वीट