भारतीय कर्णधार रोहित शर्माने भलेही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल. पण त्याने चाहत्यांना त्याची जाणीव होऊ दिली नाही. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये चक्क टी20 सारखे इनिंग खेळून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहित शर्मा आपल्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकणारा जगातील पहिला सलामीवीर ठरला आहे. कानपूरमध्ये बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला सलग दोन षटकार ठोकले. या सामन्यात त्याने छोटी पण आक्रमक खेळी खेळली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
कसोटी डावातील पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकणाऱ्या जगातील मोजक्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचा समावेश झाला आहे. असे करणारा तो पहिला सलामीवीर आहे. तर इतर तीन क्रिकेटपटू मधल्या फळीत किंवा खालच्या फळीत खेळले आहेत. यामध्ये फोफी विल्यम्सचे नाव आहे. तर सचिन तेंडुलकरचाही या यादीत समावेश आहे. उमेश यादवनेही हा पराक्रम केला आहे. विल्यम्सने हा पराक्रम 1948 मध्ये जिम लेकरविरुद्ध केला होता, तर सचिनने 2013 मध्ये नॅथन लायनविरुद्ध दोन षटकार ठोकले होते. उमेश यादवने 2019 मध्ये जॉर्ज लिंडेविरुद्ध दोन षटकार मारले होते.
हिटमॅन रोहित शर्मा स्फोटक शैलीत फलंदाजी करताना दिसला. त्याने 11 चेंडूत 23 धावांची खेळी खेळली, ज्यात 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट 209.09 होता. जरी त्याची खेळी लहान होती. तरीही ती संघाला वेगवान सुरुवात करण्यात उपयुक्त ठरली. रोहित शर्मासह यशस्वी जयस्वालने देखील आपला अंदाज बदलला नाही. त्याने देखील चांगलेच हात मोकळे केले. त्याने 51 चेंडूत 72 धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारतीय संघ कसोटी इतिहासीत सर्वात जलद 100 धावा करणारा संघ ठरला. टीम इंडियाने हा टप्पा केवळ 10.1 षटकात गाठला. या बातमी आखेरीस भारतीय 13 षटकांमध्ये 138-2 अश्या स्थिती आहे. सध्या खेळपट्टीवर शुबमन गिल आणि रिषभ पंत फलंदाजी करत आहेत.
कारण कानपूर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ खराब झाला होता आणि पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 35 षटके खेळली गेली. अशा स्थितीत भारतीय संघ या सामन्यात सकारात्मक निकाल लावण्याच्या उद्देशाने फलंदाजी करत असून. मोठी धावसंख्या उभारून बांग्लादेशला पुन्हा ऑलआउट करायचे आहे.
हेही वाचा-
राहुल द्रविडच्या मुलाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता
IND vs BAN: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी; कानपूर कसोटीत विक्रमांची मालिका…
जसप्रीत बुमराहचा आणखी एक रेकॉर्ड, 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच!