---Advertisement---

ind vs ban: बांग्लादेशचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; पाहा प्लेइंग इलेव्हन

On: गुरूवार, सप्टेंबर 19, 2024 9:14 AM
---Advertisement---

टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या पायाभरणीसाठी आज (19 सप्टेंबर) पासून मैदानात उतरली आहे. अर्थातच भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून खेळवले जात आहे. टीम इंडिया बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर खेळताना दिसत आहे. तर यजमान संघ नुकतेच पाकिस्तानला पराभूत करुन भारतामध्ये दाखल झाले आहे. वास्तविक दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात नजमुल हुसेन शांतो टाॅस जिंकला आहे. नाणेफेक जिंकून यजमान संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया 2 फिरकीपटू आणि 3 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे. ज्यामध्ये आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाजीमध्ये आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचा समावेश आहे. तर फिरकीपटूमध्ये संघाचा संकटमोचक अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला बाहेर बसावे लागले आहे. तसेच यष्टरीक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत जवळपास 2 वर्षानंतर या फाॅरमॅटमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे टी20 विश्वचषकच्या यशानंतर जसप्रीत बुमराह पहिल्यांदा संघात खेळताना दिसत आहे. दुसरीकडे बांग्लादेश संघ नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्तवाखील खेळत आहे.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज

बांग्लादेशचा संघ- शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो(कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास(यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा

हेही वाचा-

कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू
अफगाणिस्तानने आफ्रिकेचा पराभव केला; पण टीम इंडियाच्या नावावर जमा झाला हा अनोखा विक्रम!
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव कधी होणार? रिटेन्शनबाबतही खुलासा, मोठे अपडेट समोर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---