---Advertisement---

‘क्रिकेटर्सना फक्त आयपीएल खेळायचे असते, असे…’ गौतम गंभीरचा मोठा खुलासा

On: बुधवार, सप्टेंबर 18, 2024 2:38 PM
gautam gambhir
---Advertisement---

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवार (19 सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचेामुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने एका गोष्टीचे उत्तर दिले आहे ज्याची सध्या खूप चर्चा आहे. सध्या क्रिकेटपटूंना फक्त आयपीएल खेळायचे आहे आणि देशासाठी खेळण्यावर त्यांचे लक्ष नाही. असे अनेकदा म्हटले जाते. गंभीरने आपल्या एका वक्तव्यात हे पूर्णपणे फेटाळून लावले आहे.

बांग्लादेश मालिकेपूर्वी आज बुधवारी (18 सप्टेंबर) गंभीरने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना गंभीरने आयपीएलबद्दलही भाष्य केले. गंभीर आयपीएलचे समर्थन करतो. त्याने अनेक वर्ष वेगवेगळ्या संघांसाठी आयपीएलमध्ये प्रशिक्षकपदही भूषवले आहे. या वर्षी त्याच्या कोचिंगमध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल 2024 चे विजेतेपद मिळवून दिले होते.

पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर म्हणाला की, अनेकांचा असा विश्वास आहे की खेळाडूंना फक्त आयपीएल खेळायचे आहे पण तसे नाही. गंभीरने याला स्पष्टपणे नकार देत ड्रेसिंग रुममधील खेळाडूंना देशासाठी खेळायचे असल्याचे सांगितले. चेन्नईत होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी गंभीर म्हणाला, “अनेक लोक म्हणतात की खेळाडूंना फक्त आयपीएल खेळायचे आहे, परंतु हे खरे नाही. ड्रेसिंग रूममध्ये असलेले सर्व खेळाडू देशासाठी खेळू इच्छितात.”

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारत आणि बांग्लादेश दोन्ही संघ आगेकूच आहेत. पाकिस्तानला हरवल्यामुळे बांग्लदेश संघाचा आत्मविश्वास नक्कीच गगनाला भिडले आहे. अश्या स्थितीत भारतीय संघ त्यांना कमी आखण्याची चूक करणार नाही. हे ही देखील मान्य कराव लागेल. मालिकेतील पहिला कसोटी सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूरमध्ये खेळवला जाईल.

हेही वाचा-

आयपीएल 2025 पूर्वी मोठी घडामोड, रिकी पॉन्टिंगची या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
विराट की रोहित, आगामी कसोटी मोसमात कोण धावांचा पाऊस पाडणार? दिग्गजाने दिले उत्तर
विराटनं महादेवाचं नाव घेत ऑस्ट्रेलियाचा बॅन्ड वाजवला, तर गंभीरनं हनुमान चालिसा ऐकत भारताला पराभवातून वाचवलं!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---