भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत आपला विजयरथ कायम ठेवला आहे. भारताने बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव करत विजयी ‘चौकार’ मारला आहे. भारताच्या या विजयाचा हिरो विराट कोहली ठरला. त्याने नाबाद राहून शतक झळकावले. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. विराट यावेळी शतक करण्यासाठी खूपच उत्सुक दिसत होता. त्याला पाहून भारतीय खेळाडूही ड्रेसिंग रूममध्ये उत्साही झाले होते. विराटच्या या शतकात पंचांचीही मोठी भूमिका राहिली, यादरम्यानचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
विराटच्या शतकात पंचांची मोलाचे योगदान
झाले असे की, या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) 97 धावांवर खेळत होता. त्याला शतकासाठी 3 धावांची गरज होती. मात्र, भारतीय संघ आव्हानाच्या खूपच जवळ पोहोचला होता. भारताला विजयासाठी फक्त 2 धावांची गरज होती. यावेळी बांगलादेशकडून 42वे षटक नसुम अहमद टाकत होता. त्याने पहिलाच चेंडू विराटच्या डाव्या बाजूला फेकला, जो स्टम्पच्या बाहेर जाताना दिसला. तरीही मैदानी पंच रिचर्ड केटलबोरो (Richard Kettleborough) यांनी वाईड चेंडू घोषित केला नाही. तसेच, रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, चेंडू वाईड आहे. तसेच, चेंडूचा विराटच्या बॅट किंवा पॅडलाही स्पर्श झाला नव्हता.
चाहत्यांसोबतच भारतीय खेळाडूंनाही पंचांच्या या निर्णयाचा विश्वास बसला नाही. शुबमन गिल आणि कुलदीप यादव ड्रेसिंग रूममध्ये पंचांच्या या निर्णयावर हसतानाही दिसले. यानंतर विराटने याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेच वनडे कारकीर्दीतील 48वे शतक झळकावले. आता हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून सातत्याने पाहिला जात आहे.
Umpire understood what's happening & Stood by Virat Kohli 👑 💥🔥✌#ViratKohli #INDvBAN #INDvsBAN #indiavsbangladesh #KLRahul #Umpire #विराट_कोहली #किंग_कोहली pic.twitter.com/YOA4s01jk9
— Veena Jain (@DrJain21) October 19, 2023
विश्वचषकातील पहिले शतक
विराट कोहली याने वनडे विश्वचषकात आव्हानाचा पाठलाग करताना ठोकलेले हे पहिलेच शतक आहे. बांगलादेशविरुद्ध विराटने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. त्याने प्रत्येक गोलंदाजाला चोप दिला. विराटने शानदार फलंदाजी करताना 97 चेंडूत नाबाद 103 धावांची शतकी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 6 चौकारांचाही पाऊस पडला. (ind vs ban icc world cup 2023 umpire did not gave wide signal when virat kohli close to his century see video here)
हेही वाचा-
विराटने शतक ठोकल्यानंतर हजारो प्रेक्षकांपुढे मागितली जडेजाची माफी; म्हणाला, ‘मी विश्वचषकात…’
विश्वचषकाच्या 18व्या सामन्यात AUS vs PAK आमने-सामने, कोण किती पाण्यात? घ्या जाणून