मागील अनेक महिन्यांपासून भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी अफलातून होत आहे. नुकत्याच बांगलादेश विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना 14 विकेट्स घेतल्या. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजीचा भार चांगला पेलला आहे. यामध्ये त्याला उमेश यादव आणि इशांत शर्मानेही चांगली साथ दिली. या तिघांशी बांगलादेश विरुद्धचा पहिला कसोटी सामना संपल्यानंतर दिग्गज समालोचक हर्षा भोगलेंनी संवाद साधला.
या संवाद गमतीशीर झाला. या संवादादरम्यान भोगलेंशी बोलताना इशांत शर्मा म्हणाला की, शमीने कुठेही गोलंदाजी केली तरी तो विकेट घेतो.
त्याचवेळी इशांत हसत म्हणाला, मी शमीला विचारले की तु असे काय करीत आहे, जेव्हा चेंडू पॅडवर लागतो तेव्हा खेळाडू बाद होतो, फलंदाज पुल शाॅट खेळायला जातो तेव्हाही खेळाडू बाद होतो. तु काय करत आहे, ते आम्हाला पण सांग, आम्हाला फलंदाजाना बीट करुन करुन कंटाळा आला आहे.’
‘मला प्रशिक्षक आणि कर्णधाराने स्वातंत्र्य दिले आहे, हे माझ्या लक्षात राहते. बाकीचे तूम्ही लोक आहेत मला मोकळे राहू देतात आणि जास्त विचार करु देत नाहीत. कसोटी सामन्यात मी काय करावे लागते तेच मी करत आहे, मी चेंडू योग्य ठिकाणी टाकतो. तुम्ही माझे काम आणखी सोपे करता,’ असे शमी म्हणाला.
त्यावर इशांत म्हणाला, ‘आम्हीही तसेच करतो. पण मी काहीतरी वेगळे विचारत आहे, तु काहीतरी वेगळे बोलत आहे. मी देखील योग्य जागेत चेंडू टाकत आहे परंतु, तु जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा पॅडवर लागतो आणि आम्ही जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा चेंडू मिस होतो.’
इंशांतच्या या बोलण्यावर शमी हसत म्हणाला, ‘लोकांनी म्हटले आहे की ही बिर्यानीची कमाल आहे. याशिवाय माझ्यावर देवाची कृपा आहे.’
Ahead of the pink ball Test, Ishant Sharma seeks advice from Mohammed Shami. Funny banter between the two 😀
Full interview 👉👉https://t.co/hq1gKfhVIP pic.twitter.com/BcbzOmVKlm
— BCCI (@BCCI) November 16, 2019
बांगलादेश विरुद्धचा पहिला सामना 1 डाव 130 धावांनी जिंकून भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जाईल. भारत आणि बांगलादेश या दोन संघांमधील हा पहिला दिवस- रात्र कसोटी सामना असेल.
'कॅप्टनकूल' धोनीला मागे टाकत कर्णधार कोहली बनला असे करणारा पहिलाच भारतीय!
वाचा👉https://t.co/azWzNvsWTL👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019
कोहलीच्या टीम इंडियाचे त्रिशतक पूर्ण, बाकी संघांचे गुण नक्की पहा…https://t.co/yD2mdKw7rp#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia
— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019