टी20 विश्वचषक 2022च्या महाकुंभमेळ्यातील 35वा सामना भारतीय संघाच्या पारड्यात पडला. बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) मेलबर्न ऍडलेड मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशला 5 धावांनी पराभूत केले. तसेच, टी20 विश्वचषकातील तिसरा विजय मिळवला. या विजयामुळे भारताच्या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल ठेवले. या सामन्यात केएल राहुल याची बॅट चांगलीच तळपली. यावेळी राहुलची बॅटिंग पाहून दुसऱ्या एन्डला असलेला विराटही हैराण झाला. यादरम्यानचा व्हिडिओ भलताच व्हायरल होतोय.
विराटच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ
डावाच्या नवव्या षटकात बांगलादेशच्या शोरीफूल इस्लाम याच्या चेंडूवर राहुलने अर्धशतक ठोकण्यापूर्वी 2 षटकार मारले. हे षटकार इतके जबरदस्त होते की, पाहून विराट कोहली (Virat Kohli) हादेखील हैराण झाला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, विराट कोहली (Virat Kohli) याच्या नजरा केएल राहुल (KL Rahul) याने मारलेल्या षटकाराकडेच होत्या. राहुलने मारलेल्या षटकारावरील विराटच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1587766139894976512?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1587766139894976512%7Ctwgr%5E3288b400aacd0bff15eb2a883b80d053392ee453%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-ind-vs-ban-kl-rahul-s-massive-six-brings-out-priceless-reaction-from-virat-kohli-at-non-striker-s-end-watch-video-7297537.html
राहुल आणि विराटचे अर्धशतक
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अर्धशतक झळकावले. राहुलने 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचत 50 धावा चोपल्या. याव्यतिरिक्त विराटनेही 44 चेंडूंत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा चोपल्या. तसेच, सूर्यकुमार यादवनेही 30 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त आर अश्विन याने शेवटच्या षटकात 13 धावांचे योगदान देत भारताची धावसंख्या 6 बाद 184 इथपर्यंत पोहोवण्यात मोलाचा वाटा उचलला. यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना हसन महमूद याने 3 आणि कर्णधार शाकिब अल हसन याने 2 विकेट्स घेतल्या.
बांगलादेशचा पराभव
भारताचे 185 धावांचे आव्हान बांगलादेशच्या डावात पाऊस पडल्यामुळे डकवर्थ लुईस नियमामुळे 16 षटकात 151 इतके झाले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 6 बाद 145 धावाच करता आल्या. यामुळे बांगलादेशला या सामन्यात 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद शमी यानेही 1 विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हातात ब्रश घेऊन मैदानावर फिरणारा ‘तो’ व्यक्ती आहे तरी कोण? भारताच्या विजयात उचललाय मोलाचा वाटा
विराटच्या षटकारावर इंग्लंडची महिला खेळाडूही फिदा, जे काही म्हणाली त्याने कोहलीही होईल खुश