भारत आणि बांगलादेशमध्ये 22 ते 26 नोंव्हेबर दरम्यान खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा भारताचा कसोटी इतिहासातील पहिलाच दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे.
हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावार खेळला जाणार आहे. यानिमित्ताने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने अनेक विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे.
याशिवाय या कसोटीतील नाणेफेकही खूप खास ठरणार आहे. या सामन्यात सोन्याच्या नाण्याने नाणेफेक होईल, तर चांदीचे नाणे बांगलादेशच्या यजमान संघाला प्रतीकचिन्ह म्हणून भेट देण्यात येईल.
तसेच या सामन्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना स्वत: सौरव गांगुलीच्या वैयक्तिक आमंत्रणाच्या विनंतीवरून भारत दौर्यावर येणार आहेत. बंगालच्या क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या भव्य स्वागताची तयारी सुरू केली आहे.
त्यांच्या जेवणाची खास व्यवस्था केली जात आहे आणि यासाठी 50 पदार्थांची नावे निश्चित करण्यात आली आहे.
बांगलादेशचा संघ सध्या भारताविरुद्धच्या टी -20 मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेचा पहिला सामना दिल्ली येथे खेळला गेला. दुसरा सामना 7 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबरला तिसरा टी20 सामना पार पडेल. या टी20 मालिकेनंतर 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. 14 ते 18 नोव्हेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना इंदोरला होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
सलग ५ चेंडूत ५ षटकार मारणाऱ्या शिवम दुबेबद्दल युवराज सिंग म्हणाला
#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi https://t.co/3IDuHsfB1H— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019
हरभजन सिंग या भारतीय गोलंदाजाला म्हणाला 'देव आनंद'#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi https://t.co/eedQGMAzIn
— Maha Sports (@Maha_Sports) November 7, 2019
…तर हिटमॅन रोहित शर्मा मोडणार सुरेश रैनाचा हा विक्रम #म #मराठी @Mazi_Marathi @beyondmarathi #Cricket #INDvBAN #RohitSharma https://t.co/EYE7bVLcbm
— Maha Sports (@Maha_Sports) November 6, 2019






