भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना अनेक कारणासाठी आठवणीत ठेवला जाऊ शकतो. कारण सामन्यामध्ये असे अनेक किस्से, घटना किंवा विक्रम घडले आहेत. जे क्रिकेट चाहत्यांना विसरता येणे तसे अवघड आहे. दरम्यान आता या बातमीद्वारे सामन्यातील झालेल्या एका खास विक्रमाबद्दल जाणून घेऊयात. वास्तविक टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने शानदार इतिहास रचला आहे. सामन्यातील शेवटचा 10 वा विकेट घेत त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे.
रवींद्र जडेजा सर म्हणून देखील ओळखला जातो. तसेच त्यानावासाठी तो पात्र देखील आहे. याची प्रचीती आज (30 सप्टेंबर) पुन्हा एकदा झाली. जड्डू कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा आणि 300 विकेट पूर्ण करणारा आशियाई क्रिकेटपटू बनला आहे. त्याने केवळ 74 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याचे भारतीय क्रिकेट इतिहासतील 300 विकेट्स आणि 300 धावा करणार तिसरा भारतीय अष्टपैलू ठरला आहे.
भारतासाठी कसोटीत 3000 धावा आणि 300 बळी
कपिल देव – 5248 धावा आणि 434 विकेट्स
रविचंद्रन अश्विन – 3422 धावा आणि 524 विकेट्स
रवींद्र जडेजा – 3122 धावा आणि 300 विकेट्स
कसोटीत 300 बळी आणि 3000+ धावा असलेले फिरकी गोलंदाजी अष्टपैलू
डॅनियल व्हिटोरी: 4531 धावा आणि 382 विकेट्स
रविचंद्रन अश्विन: 3422 धावा आणि 522 विकेट्स
शेन वॉर्न: 3154 धावा आणि 708 विकेट्स
रवींद्र जडेजा : 3122 धावा आणि 300 बळी
सामन्याबद्दल बोल्याचे झाल्यास बांग्लादेश संघ पहिल्या डावात 74.2 षटकात 233 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामध्ये मोमिनुल उल-हकने शानदार शतकी खेळी खेळली. तर गोलंदाजीत भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवी आश्विन आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
पहिल्या डावात फलंदाजी करायला उतरलेल्या भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. या बातमी आखेरीस टीम इंडिया 9 षटकांमध्ये 90-1 अश्या स्थितीत आहे. रोहित शर्माच्या (23) रुपात संघाला पहिला धक्का बसला. तर यशस्वी जयस्वाल अर्धशतकी (55) खेळीसह नाबाद आहे.
हेही वाचा-
जसप्रीत बुमराहचा आणखी एक रेकॉर्ड, 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच!
बांगलादेशच्या फलंदाजाची शतक ठोकूनही फजिती! नकोश्या लिस्टमध्ये मिळवलं स्थान
अद्भूत, अविश्वसनीय!! मोहम्मद सिराजचा मागे डाइव्ह मारत खतरनाक झेल; VIDEO एकदा पाहाच