भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर, रविवार) ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
याआधी दोन्ही संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळले होते. टीम इंडियानं कसोटी मालिका 2-0 ने जिंकली होती. चला तर मग, पहिल्या टी20 सामन्यात भारत आणि बांगलादेश यांची प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टीचा अहवाल आणि सामन्याचा अंदाज काय असू शकतो हे जाणून घेऊया.
ग्वाल्हेरच्या या नवीन स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. बोललं जातंय की, या मैदानात लाल मातीची खेळपट्टी आहे, जी चांगली उसळी घेते आणि वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. येथे सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. परंतु खेळ जसजसा पुढे जाईल तसतशी फलंदाजी सोपी होत जाईल. आता सामन्यादरम्यान येथील खेळपट्टी कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियानं अलीकडेच कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता. मात्र कसोटीत टीम इंडियाची स्थिती खूपच वेगळी होती. टी20 मध्ये भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. संघातील खेळाडू वेगळे असले तरी या विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढेल. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा या सामन्यात वरचष्मा असेल असं मानलं जातंय.
पहिल्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रियान पराग, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयंक यादव, हर्षित राणा
पहिल्या टी20 साठी बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – तनजी हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन सांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, झेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तन्झीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम/तस्कीन अहमद
हेही वाचा –
MS Dhoni : आयपीएल 2025 मध्ये एमएस धोनी खेळणार का? मोठे अपडेट समोर
AUSW vs SLW: कांगारूंची वरचढ, आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा दारुण पराभव
बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कर्णधार कोण? काही स्टार खेळाडूंची नावं चर्चेत