इंदोरच्या होळकर स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मयंक अगरवालने उत्तम कामगिरी केली.
भारताने एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवलेल्या या सामन्यात पहिल्या डावात मयंकने 243 धावा केल्या. हे त्याच्या कसोटी क्रिकेटमधले दुसरे दुहेरी शतक होते.
जेव्हा मयंकने 200 धावा पूर्ण केल्या तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंगमध्ये बसून त्याच्याकडून एक खास मागणी केली होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही.
जेव्हा मयंकने दुहेरी शतक पूर्ण होण्याचा आनंद साजरा केला तेव्हा कोहलीने तिहेरी शतकी खेळी करण्याचा इशारा त्याला दिला होता. मात्र मयंकने दुहेरी शतकानंतर धावांचा वेग वाढविला. अखेर तो आक्रमक खेळण्याच्या नादात मेहदी हसनच्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे त्याची त्रिशतकी खेळी करण्याची संधी हुकली.
झाले असे की जेव्हा मयंकने जेव्हा दिडशतक पूर्ण केले तेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला संयमाने खेळत रहा आणि द्विशतक पूर्ण कर अशाप्रकारचे हातवारे करत इशारा दिला. यावर मयंकनेही ठिक आहे, असे हात उंचावून त्याला होकार दिला होता.
https://www.instagram.com/p/B44TNWmAlFy/
त्यामुळे मयंकने जेव्हा द्विशतक पूर्ण केले, त्यावेळेस त्याने ड्रेसिंगरुमकडे पाहत द्विशतक पूर्ण झाले असा इशारा केला. याचवेळी विराटनेही आता त्रिशतक कर असा हसून इशारा दिला होता. याचे व्हिडिओ बीसीसीआयने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
https://www.instagram.com/p/B44gR4hgObb/?utm_source=ig_embed
मयंकने या सामन्यात 330 चेंडूत 243 धावा केल्या, त्यात 28 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.
मयंक अगरवालने द्विशतकी खेळीनंतर अशाप्रकारे केले चाहत्यांना खूश, पहा फोटो
वाचा- https://t.co/DPVTDxCSrM#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi
@BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019
दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी अशी असेल खेळपट्टी, गांगुलीने केला खूलासा
वाचा- 👉https://t.co/iBRVGpTxWP👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019