यजमान टीम इंडियाने भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केला आहे. यशस्वी जयस्वालही भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने दोन्ही डावात अर्धशतक केले. यशस्वीने दोन्ही डावात 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने अर्धशतके झळकावली. अशा प्रकारे यशस्वी वीरेंद्र सेहवागच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला.
कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावात 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने अर्धशतक झळकावणारा सेहवाग हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. जयस्वालने आपल्या 12 व्या कसोटी सामन्यात या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे मजबूत कसोटी फलंदाज देखील प्रवेश करू शकले नाहीत. वीरेंद्र सेहवागबद्दल बोलायचे तर त्याने 2011 मध्ये हा पराक्रम केला होता. दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सेहवागने 46 चेंडूत 55 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्याने 55 चेंडूत 55 धावा केल्या होत्या.
यशस्वीबद्दल सांगायचे झाले तर, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 51 चेंडूत 72 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात 45 चेंडूत 51 धावा करून तो बाद झाला. याशिवाय जयस्वालने 2024 मध्ये एकूण 929 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 23 वर्षांचा होण्यापूर्वी एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने सुनील गावस्करला मागे टाकले आहे. सुनील गावसकर यांच्या नावावर 23 वर्षांचा होण्यापूर्वी एका वर्षात भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता. गावस्कर यांनी 1971 मध्ये एकूण 918 धावा केल्या होत्या.
कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सामन्याच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशने 35 षटकात 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत एकही खेळ होऊ शकला नाही. दोन दिवस पाऊस आणि ओले मैदान यामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाने प्रथम बांग्लादेशला 233 धावांवर ऑलआउट केले. त्यानंतर 9 विकेट्सवर 285 धावा करत डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात बांग्लादेशला 146 धावांवर बाद केले आणि तीन विकेट गमावून विजयासाठी आवश्यक 95 धावा पूर्ण केल्या.
हेही वाचा-
IND vs BAN: टीम इंडियाने बांग्लादेशला हरवून मायदेशात साकारला सलग 18वा कसोटी मालिका विजय
खतरनाक..! टीम इंडियाचा दणदणीत विजय, बांग्लादेशच्या चारीमुंड्या चीत..! मालिका 2-0 ने खिश्यात
जे इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला नाही जमलं ते भारतानं करुन दाखवलं, 21व्या शतकात अशी कामगिरी करणारा पहिला देश