श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025पूर्वी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे. अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला बळकटी दिली आहेच, पण आयपीएल 2025 साठी पंजाब किंग्जलाही आनंदाची बातमी दिली आहे. हे अय्यरचे एकदिवसीय सामन्यांमधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी 2019 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित फक्त 2 धावा काढून बाद झाल. त्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. रोहित बाद झाल्यानंतर टीम इंडियाने फक्त 19 धावांत दोन विकेट गमावल्या. मात्र यानंतर श्रेयस अय्यरने इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. त्याने जलद धावा करत फक्त 30चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. परंतु त्याचा डाव 59 धावांवर संपला. त्याने 36 चेंडूत 59 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने संपूर्ण डावात 11 चौकार मारले आणि सुमारे 164 च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
SHREYAS IYER AT NUMBER 4 IN ODIs:
– 34 Innings.
– 1456 Runs.
– 52 Average.
– 103.33 Strike Rate.
– 4 Hundreds.
– 9 Fifties.The man for India in ODIs, needs to respect him a lot in this format. 🇮🇳 pic.twitter.com/K7rjmpFvZo
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2025
भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू अजित आगरकर आहे. ज्याने 2000 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध फक्त 21 चेंडूत अर्धशतक केले होते. अजित आगरकर आता टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता देखील आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज कपिल देव आहे. ज्याने 1983 मध्ये 22 चेंडूत अर्धशतक केले होते. राहुल द्रविड आणि युवराज सिंग यांनीही एकदिवसीय सामन्यांमध्ये 22 चेंडूत अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत सूर्यकुमार यादवचे नावही समाविष्ट आहे. ज्याने 24 चेंडूत एकदिवसीय अर्धशतक केले आहे.
हेही वाचा-
रवींद्र जडेजाने झहीर खानचा विक्रम मोडला, कपिल देवच्या खास क्लबमध्ये प्रवेश
सुसाट चाललेल्या इंग्लंडला टीम इंडियाने दाखवला लाल दिवा, भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य
IND vs ENG: टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचे सामन्यात पदार्पण, विराट कोहली बाहेर